काबूल : अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. तालिबान्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळचा तालिबान बदलल्याचा दावा केला. तसेच शरिया कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य देऊ असं म्हटलं. मात्र, या तालिबानचा खरा शोषणकारी चेहरा वारंवार समोर येत आहे. अनेक व्हिडीओंमध्ये तालिबानचा सामान्य नागरिकांवरील अत्याचार उघड होतोय. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानमधील भारतीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र, अद्यापही 1600 भारतीय तालिबानचं नियंत्रण असलेल्या अफगाणमध्ये अडकलेले आहेत.