AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्युटीवरील पोलिसाला कोरोना झाल्यास 10 हजार रुपयांची मदत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार

मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. अनेक पोलीसही कोरोनाच्या (Help to Corona positive Police) कचाट्यात सापडले आहेत.

ड्युटीवरील पोलिसाला कोरोना झाल्यास 10 हजार रुपयांची मदत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Apr 23, 2020 | 4:41 PM
Share

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. अनेक पोलीसही कोरोनाच्या (Help to Corona positive Police) कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाबाधित पोलिसांना मदत मिळावी म्हणून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ड्युटीवर असताना अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास, त्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचं परिपत्रक नुकतंच मुंबई पोलीस दलातील प्रशासन विभागाचे सहआयुक्त नवल बजाज यांनी जारी केलं आहे. बक्षीस स्वरुपात ही रक्कम दिली जाणार आहे. (Help to Corona positive Police)

सध्या 05 बक्षीस या उद्दिष्टाखाली राज्य सरकारकडून रक्कम मंजूर झालेली नाही. त्यामुळे पोलीस कल्याण निधीतून ही रक्कम दिली जाणार आहे. ज्या पोलिसांना कर्तव्य बजावताना , ड्युटीवर असताना कोरोना झाला आहे त्यांनाच ही रक्कम दिली जाणार आहे.

जे पोलीस अधिकारी कर्मचारी गैरहजर आहेत, आजारपणाच्या सुट्टीवर आहेत किंवा जे निलंबित आहेत त्यांना ही मदत मिळणार नाही, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

औषधोपचारासाठी बिनव्याजी 1 लाख रुपये दरम्यान, ड्युटीवर असताना कोरोना झाल्यास, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला औषधोपचारासाठी तातडीने 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयसवाल यांनी सोमवारी त्याबाबत आदेश दिले आहेत. पोलीस कल्याण निधीतून ही रक्कम संबधितांना अग्रीम स्वरूपात द्यावयाची आहे. त्यावर काहीही व्याज न आकारता सोयीनुसार त्याची परतफेड घेतली जाणार आहे.

राज्यात आतापर्यंत 64 पोलिसांना कोरोना

राज्यात 23 मार्चपासून ते आतापर्यंत एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 11 पोलीस अधिकारी आहेत. तर 53 पोलीस शिपाई आहेत. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात तब्बल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Police infected corona) यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

संबंधित बातम्या

 रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण, राज्यभरात 64 पोलिसांना कोरोना

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?