AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची मुलगी विवाहबंधनात

मुंबई : भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि अब्जाधीश उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल हे दोघे 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. संपूर्ण विश्वाचं लक्ष या ग्रँड लग्न सोहळ्याकडे होतं. हा संपूर्ण भव्य सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री सुमारे 4 वाजता नवरीची विदाई झाली. शेवटच्या या क्षणापर्यंत संपूर्ण […]

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची मुलगी विवाहबंधनात
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि अब्जाधीश उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल हे दोघे 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. संपूर्ण विश्वाचं लक्ष या ग्रँड लग्न सोहळ्याकडे होतं. हा संपूर्ण भव्य सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री सुमारे 4 वाजता नवरीची विदाई झाली.

शेवटच्या या क्षणापर्यंत संपूर्ण कुटुंब आलेल्या पाहुण्यांसह उपस्थित होतं. या लग्नात मुकेश अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय. या हाय प्रोफाईल आणि शाही विवाह सोहळ्यात नुसतेच देशातले नाही, तर संपूर्ण विश्वातून आलेल्या मोठ्या हस्तींचा समावेश होता. इतकेच नाही तर बॉलीवूड ते राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रमुख चेहरे या लग्नात पाहायला मिळाले. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलेरी क्लिंटन देखील या ग्रँड विवाह सोहळ्यात उपस्थित होत्या.

लग्नाच्या आधी मुकेश अंबानी यांनी उदयपूरमध्ये एक प्री वेडिंग सोहळा ठेवला होता. 7 डिसेंबरला झालेल्या या सोहळ्यात 5 हजार 100 लोकांसाठी चार दिवसांची विशेष अन्न सेवा सुरु केली होती. या लोकांना 10 डिसेंबरपर्यंत रोज तीनवेळचं जेवण देण्यात आलं.

8 आणि 9 डिसेंबरला लग्नापूर्वीचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात अमेरिकेच्या माजी प्रथम महिला हिलेरी क्लिंटन, प्रसिद्ध रॉक सिंगर बियॉन्स यांची विशेष उपस्थिती होती. तर बॉलीवूडचेही अनेक दिग्गज कलाकार ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात थिरकताना दिसले होते.

लग्नाला उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींची यादी

सलमान खान

शाहरुख खान आणि गौरी

आमिर खान आणि किरण राव

सैफ अली खान, करिश्मा आणि करीना कपूर

जावेद अख्तर आणि शबाना आजमी

बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर

शाहीद कपूर आणि मीरा राजपूत

शिल्पा शेट्टी

रवीना टंडन

जॅकलीन फर्नांडिस

अमिताभ बच्चन, अभिषेक, जया, ऐश्वर्या, आराध्या आणि श्वेता बच्चन

महेश भूपती आणि लारा दत्ता

सोनम कपूर आणि अनिल कपूर

युवराज सिंह और हेजल कीच

ऋतिक रोशन

रेखा

रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस

विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर

मनीष मल्होत्रा

अनिल कुंबळे

दिशा पटानी, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ

रजनीकांत आणि त्यांची पत्नी

हरभजन सिंह आणि गीता बसरा

आलिया भट्ट

सचिन तेंडुलकर, अंजली आणि अर्जुन तेंडुलकर

कियारा अडवाणी

अनिल अंबानी आणि टिना अंबानी

विधु विनोद चोप्रा

सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी

सुभाष चंद्रा

प्रणब मुखर्जी

पी. चिदंबरम

सुशील कुमार शिंदे

विजय रूपाणी

मनीष तिवारी

उदय कोटक

संजीव गोयंका

मनीष पटेल

राजनाथ सिंह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशिष शेलार

तेजस्वी यादव

नारायण राणे

उज्वल निकम

राज ठाकरे आणि परिवार

उद्धव ठाकरे आणि परिवार

हिलेरी क्लिंटन

पृथ्वीराज चव्हाण

अशोक चव्हाण

त्रिवेन्द्र सिंह रावत

चंद्राबाबू नायडू

माजी पंतप्रधान देवगौडा

रतन टाटा

आदी गोदरेज

ममता बॅनर्जी

जयंत सिन्हा

प्रफुल्ल पटेल

सज्जन जिंदल

आनंद महिंद्रा

के. वी. कामत

रजत शर्मा

अर्णब गोस्वामी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.