AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत?; भाजप नेत्यानं एकनाथ खडसे यांना जागा दाखवून दिली

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे राजकी वैर राज्याला माहिती आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी गिरीश महाजन यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती.

मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत?; भाजप नेत्यानं एकनाथ खडसे यांना जागा दाखवून दिली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 11, 2023 | 8:12 PM
Share

जळगाव: आजच्या दिवस राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा ठरला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कर्जत, पुणे दौरा तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून दुसऱ्यांदा टाकलेली धाड तर दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचे समर्थक संजय पवार यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

तर एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या ॲड. रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यावरून आता जळगावमध्ये जोरदार राजकीय उलधापालथींना वेग आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हा बँकेत पराभव झाल्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे राजकी वैर राज्याला माहिती आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी गिरीश महाजन यांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव झाल्या नंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माणूस हवेत उडायला लागला की, तो जोरात खाली आपटतो अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.

यावेळी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले की, सर्व ठिकाणी मी हा एकनाथ खडसे यांचा अहंकार जास्त झाला होता तो अहंकार आजच्या निवडणुकीत उतरवला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांचा बाहुबली असा उल्लेख करत बाहुबली म्हणून घेणाऱ्या एकनाथ खडसे यांना आम्ही जागा दाखवून दिली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

जळगाव बँकेच्या टीकेवरून त्यांनी थेट एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Follow Us
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी