Karuna Munde: धनंजय मुंडे हे दुसरे खरात, करुणा मुंडेंचा प्रहार, म्हणाल्या, चांगल्या पत्नीला सोडून…

Karuna Munde on Dhananjay Munde: राज्यात एका महिन्यापासून भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण गाजत आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, अनेकांना फसवल्याचे आता समोर आले आहे. त्याचवेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मोठा प्रहार केला आहे.

Karuna Munde: धनंजय मुंडे हे दुसरे खरात, करुणा मुंडेंचा प्रहार, म्हणाल्या, चांगल्या पत्नीला सोडून...
धनंजय मुंडे, करुणा मुंडे, अशोक खरात
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 15, 2026 | 1:57 PM

Karuna Munde on Ashok Kharat: भोंदू अशोक खरात भोवती राज्याचं राजकारण फिरत असल्याचे दिसते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातशी संपर्कात असलेल्या राजकारण्यांची नावं समोर आणली, कॉल कुंडली बाहेर आणली. राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने मोठे सिडिंकेट उभारले. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना गंडवले. जादूटोण्याची भीती घालून व्यापाऱ्यांना लुबाडले. तर राजकारण्यांचा आणि अधिकाऱ्यांचा फायदा केला. त्याने अफाट माया जमवली. या प्रकरणात विविध खुलासे होत असतानाच आता करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या विखारी टिकेने एकच खळबळ उडाली आहे.

राज्य महिला आयोगाचे पद राष्ट्रवादीला नको

राज्य महिला आयोगाच्या पद हे राष्ट्रवादीकडे परत गेले तर महिलांना न्याय मिळाणार नाही असा दावा करुणा मुंडे यांनी केला. देवा भाऊंना मी एवढेच विनंती करेन यामध्ये कोणीही राजकारण करता कामा नये आणि महिला आयोगाचे पद हे योग्य व्यक्तीला दिले पाहिजे. महिला निवृत्त न्यायाधीशाला हे पद मिळायला हवे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांना मोठ्या नेत्यांचे पाठबळ

रुपाली चाकणकर यांना मोठ्या नेत्यांचे पाठबळ आहे. कोण पाठबळ देते आहे, हा मोठा प्रश्न, महिलांचं कधीपर्यंत खच्चीकरण होणार , खात्यांचे व्यवहार दिसतात, एवढे फोन कॉल्स आहेत, खरातला निधी वाटप होतो. खरात याचे फोटो सगळ्या मोठ्या राजकारण्यांसोबत आहे. सगळं उघड व्हायला पाहिजे. याप्रकरणाचा मुख्य आका कोण हे समोर आलं पाहिजे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे दुसरे खरात

धनंजय मुंडे हे दुसरे खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. खरात प्रकरणात नेता, मंत्री कोणी का असेना त्याचं नाव समोर आलं पाहिजे, रुपाली चाकणकर यांची चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर आंदोलन करणार असा इशारा करुणा मुंडे यांनी दिला.

याप्रकरणात आयजी कराळे यांचे संबंध काय हे समोर आलं पाहिजे. त्यांनी खरातला का साथ दिली? ते कसे संपर्कात आले ? ते पोलीस असून असं करतात, तर मग त्यांची चौकशी केली पाहिजे.एपिस्टनसारखा खरातचाही खून होऊ शकतो. त्यामुळे तो मेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. यात बरेच मोठे मासे आहेत, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांना जर कार्याध्यक्ष बनवला तर मी केव्हा एवढेच सांगेल की जी चूक मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी केल, त्यांच्या मुलाला त्यावेळी पर्यावरण मंत्री बनवलं आणि सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलला तसाच प्रकार यावेळी त्यांनी करू नये. निष्ठावंत शिवसैनिकांना संधी द्यावी, असे मत करुणा मुंडे यांनी मांडलं.

Follow Us