AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्होट जिहाद, लँड जिहाद… सबक शिकवावा लागणार, सोमय्यांनी वांद्र्यात येऊन ललकारले

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्रे प्रकरणावर बोलताना जे माफिया आहेत, एका बाजूला व्होट जिहाद माफिया, दुसऱ्या बाजूला लँड जिहाद यांना सबक शिकवावा लागणार आहे.

व्होट जिहाद, लँड जिहाद... सबक शिकवावा लागणार, सोमय्यांनी वांद्र्यात येऊन ललकारले
Kirit SomaiyaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 20, 2026 | 9:00 PM
Share

मुंबईमधील वांद्रे आज तणावाचे वातावरण पहायला मिळाले. रेल्वेकडून गरीब नगरमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु असताना स्थानिकांनी याला विरोध केला. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी आधी पोलिसांवर बाटल्या आणि दगड फेकले, यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आता या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्र्यात जाऊन भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

व्होट जिहाद, लँड जिहाद यांना सबक शिकवावा लागणार

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, माझी डीसीपी आणि सिनियर आफिसर यांच्या सोबत बोलणं झालं आहे. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे. पण हे जे माफिया आहेत, एका बाजूला व्होट जिहाद माफिया, दुसऱ्या बाजूला लँड जिहादचे माफिया आणि तिसऱ्या बाजूला ड्रग माफिया यांना सबक शिकविला जाणार आहे.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होणार

पुढे बोलताना सोमय्या यांनी म्हटले की, अशा प्रकारे न्यायालयच्या निर्णयावर, पोलिसांवर जर हल्ला केला तर कोणाची खैर नाही, एक एकाला जो पण यांच्या मागे आहे त्याला कठोर शिक्षा होणार. एका बाजूला हे सर्व अतिक्रमण हटविले जाणार आहे आणि ताबडतोब रेल्वे अधिकारी तिथे टर्मिनसचा विकासाचा काम सुरू करणार.

राजकीय नेत्याचा हात?

जखमींबाबत माहिती देताना सोमय्या यांनी म्हटले की, आरपीएफ आणि जीआरपीतील काही जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुन्हा अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु झालेला आहे. आता पोलीस आपला काम करत आहेत, परिस्थिती आता आटोक्यात आहे. गुंडे आणि माफियांची नावे लक्षात आलेली आहेत. कुठला तरी राजकीय पक्षाचा नेता उकसवायचा काम करीत आहे. पण चौकशी होणार आणि त्या राजकीय माफीयांवर कारवाई होणार. पोलिसांना मारहाण करण्यात आली त्याच्यासाठी मी आलो होतो. पण आता स्थिती आटोक्यात आहे आणि ज्यांना लागला ते ही आता सुखरूप घरी जात आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ