Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार, अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणार

| Updated on: Jan 25, 2022 | 2:09 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार, अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणार
cm uddhav thackeray
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यापासून ते प्रथमचं सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती. मात्र, 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळयाला ते उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 तारखेला वर्षा या शासकीय निवासस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पूर्ण ताकदीनं सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमाला जवळपास अडीच महिन्यानंतर उपस्थिती लावतील.

अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर ते अडीच महिन्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 12 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्यावर स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते ऑनलाईन बैठका आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत होते. आता उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क इथं होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

विरोधकांकडून स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत या निर्णयाचं भाजपच्यावतीनं स्वागत करण्यात आलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीकडे याविषयी भूमिका मांडली. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना आम्ही राज्याचे प्रश्न सुटावेत म्हणून मुख्यमंत्री कुठं आहेत हे विचारत होतो. ते प्रश्न म्हणजे टीका नव्हती, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. केवळ एका पक्षाचे प्रमुख नाहीत. त्यांनी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची जबाबदारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना स्वीकारली आहे. राज्याच्या जनतेचे प्रश्न उपस्थित करायचे असल्यानं आणि त्यावर निर्णय व्हावेत या भावनेतून मुख्यमंत्री जर विधानभवानात येऊ शकत नसतील तर ते खातं इतरांना द्यावं, अशा सूचना केल्या होत्या ती टीका नव्हती, असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.

इतर बातम्या :

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Uddhav Thackeray will attend Republic Day Function at Shivaji Park