Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

नाशिक जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी भागात आर्थिक परिस्थितीमुळे भीषण स्थिती आहे. या भागातील विद्यार्थिनींचे आश्रमशाळेमुळे कसेतरी शिक्षण सुरू झाले होते. मात्र, कोरोनाने त्यातही खंड पडल्याने त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर येत आहे.

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:36 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या एकामागोमाग एक आत्महत्या (Student suicide) सुरूच आहेत. आता सुरगाणा येथे ऑनलाईन अभ्यासात अडचणी येत असल्याने एका अकरावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा हादरला असून, ऑनलाईन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे असा प्रश्न पडला आहे. कोरोनाने सर्वात जास्त नुकसान विद्यार्थी आणि लहान मुलांचे झाले. शाळा आणि कॉलज सतत बंद असल्याने त्यांच्या अभ्यासात नाना विघ्न येत असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले आहे.

शाळेतच घेतला गळफास

अलंगुण येथील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळेत ही विद्यार्थिनी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. सोमवारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, या विद्यार्थिकडे स्वतःचा मोबाईल नव्हता. त्यामुळे ऑनलाईन क्लास आणि अभ्यासामध्ये ती इतर विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडलेली होती. इतरांचा मोबाईल घेऊन ती ऑनलाईन क्लासेस करायची. मात्र, त्यानंतरही तिचा अभ्यास पूर्ण झाला नाही. त्यामुळे वाढलेला अभ्यास आणि सुरू झालेली शाळा याचा ताण तिला सहन झाला नाही. अखेर तिने सोमवारी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

सलग तिसरी घटना

काही दिवसांपूर्वी महिन्यात सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील आश्रमशाळेत एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. तिनेही शाळेतल्याच लोखंडी रॉडला गळफास घेतला होता. तर डिसेंबर महिन्यात हर्सूल जवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाची ही राज्यात स्थापन झालेली पहिली आश्रम शाळा आहे. तिनेही या शाळेतच अखेरचा श्वास घेतला. या तिन्ही मुली अभ्यासात हुशार होत्या. मात्र, परिस्थितीमुळे त्यांनी इतक्या लहान वयात या जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आदिवासी भागात भीषण स्थिती

नाशिक जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी भागात आर्थिक परिस्थितीमुळे भीषण स्थिती आहे. या भागातील विद्यार्थिनींचे आश्रमशाळेमुळे कसेतरी शिक्षण सुरू झाले होते. मात्र, कोरोनाने त्यातही खंड पडला. या आश्रमशाळाही बंद झाल्या. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र, आदिवासी पाड्यावरील गरीब घरांना कसलाच मोबाईल घेणे परवडत नाही. तिथं अँड्रॉईड मोबाईल आणि रिचार्ज ही दूरची गोष्ट. काहीही करून हे सर्व केले तर रेंज नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रचंड परवड सुरू आहे.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.