Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

नाशिक म्हाडाप्रकरणी चौकशी सुरू आहे. अहवालात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
jitendra awhad
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 11:20 AM

नाशिकः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा सलग 2 ट्वीट करून नाशिक म्हाडाच्या राखीव भूखंडामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही आव्हाड यांनी असेच ट्वीट केले होते. त्यात नाशिक महापालिकेमुळे एक-दोन नव्हे, तर तब्बल 700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे खापर फोडले होते. आता त्यांच्या नव्या ट्वीटने पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर याप्रकरणाची चर्चा रंगत आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अहवालात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

नेमके प्रकरण काय?

2014 च्या कायद्यानुसार शहरातील मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील (4 हजार चौरस फुटापेक्षा जास्त बांधकाम) 20 टक्के घरे हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असतात. मात्र, नाशिकमध्ये असे अनेक बिल्डरांनी केलेच नाही. अशा बिल्डरांवर महापालिकेने ‘एनओसी’ अर्थातच ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे, असा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करून केला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी, 19 जानेवारी रोजी एक ट्वीट केले. त्यात ते म्हणतात, नाशिक महापालिकेतील विकासकांनी म्हाडाला द्यायचे प्लॅट दिलेले नाहीत. त्याकडे महापालिकेने घोर दुर्लक्ष केले आहे. असे 3500 प्लॅट म्हाडाला मिळणार होते. मात्र, ते मिळाले नसल्यामुळे एकूण 700 कोटींचे नुकसान झाले आहे. याची सारी जबाबदारी नाशिक महापालिकेची आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा आव्हाड यांनी दोन ट्वीट केले आहेत.

आव्हाडांचे पहिले ट्वीट…

नाशिकमधील म्हाडा सदनिकाप्रकरणी मंत्री आव्हाड यांनी 24 जानेवारी रोजी केलेल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आधी 34 प्रकल्प म्हाडा संबंधी सांगितले. त्यानंतर त्यांच्या नगररचनाकाराने ते 84 असल्याचे सांगितले. हे सगळे प्रकल्प सदनिकांसंबंधी होते. आणि एक एकरच्या पुढचे लेआऊट किती आहेत याचा कुठलाही हिशोब द्यायला महानगरपालिका तयार नाही, असा दावा आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाडांचे दुसरे ट्वीट…

म्हाडा सदनिका प्रकरणी 24 जानेवारी रोजी केलेल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणतात की, कारण ते लेआऊट फक्त आयुक्तांच्या सहीने मंजूर होतात. हा सगळा घोटाळा फार मोठा आहे. याबाबत पोलीस खात्याकडे तक्रार करावीच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, तक्रार कधी करणार आणि ही तक्रार नेमकी कोण करणाचा याचा काहीही उल्लेख त्यांनी केलेला नाहीय.

आयुक्त म्हणतात…

नाशिकमधील म्हाडा सदनिकाप्रकरणी आम्ही चौकशी सुरू केली आहे. यात काही गैरप्रकार आढळल्यास आणि कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला आहे.

इतर बातम्याः

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Nashik Sports Awards | नाशिक जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा; कोणत्या गुणवंत खेळाडूंचा होणार गौरव?

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.