AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानात पॅराशूट का ठेवत नाहीत? 99 टक्के लोकांना अजूनही माहिती नाही खरं कारण

जर विमानाचा अपघात झाला तर अशा स्थितीमध्ये पॅराशूटच्या मदतीने जीव वाचवणं अगदी सोपं आहे. मात्र असं असताना देखील विमानात पॅराशूट ठेवल्या जात नाही? त्या मागे नेमकं काय कारणं असावं? हे तुम्हाला माहिती आहे का?

विमानात पॅराशूट का ठेवत नाहीत? 99 टक्के लोकांना अजूनही माहिती नाही खरं कारण
airplane Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 6:41 PM
Share

तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल, अलीकडच्या काळात तर विमान अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. ट्रेनचा अपघात झाला, किंवा एखाद्या दुसऱ्या वाहनाचा अपघात झाला, तर त्यामधून वाचण्याची थोडीतरी शक्यता असते, अशा अपघातामधून अनेकदा प्रवाशांचा जीव वाचतो, मात्र जेव्हा विमानाचा अपघात होतो, विमान जमिनीवर कोसळतं, तेव्हा अशा अपघातामधून प्रवाशी वाचण्याची शक्यता नसते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की प्रवासी विमानात पॅराशूट का नसतं? जर विमानात पॅराशूट असेल तर अपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशी या पॅराशूटचा उपयोग करून आपला जीव वाचवू शकतात, असंही तुम्हाला वाटत असेल, आणि तसं वाटणं सहाजिक देखील आहे. मात्र जीव वाचवण्याचा हा उपाय जेवढा वाटतो तेवढा सहज सोपा नाहीये, चला तर मग जाणून घेऊयात विमानामध्ये पॅराशूट का नसतं?

विमानात पॅराशूट का नसतं? आणि पॅराशूटचा वापर करून विमानात प्रवाशांचा जीव का वाचवला जात नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रवाशी विमानं ही आकारानं प्रचंड मोठी असतात. या विमानांमधून एकाचवेळी शेकडो लोक प्रवास करतात. त्यामुळे जर अशा स्थितीमध्ये प्रत्येक प्रवाशाच्या सिट खाली एक पॅराशूट ठेवलं तर अशा स्थितीमध्ये प्रवाशांचा जीव वाचवणं हे आणखी आवघड काम बनेल. फायटर जेटमध्ये पॅराशूट असतं, मात्र प्रवाशी विमानामध्ये पॅराशूट नसतं, कारण दोन्ही विमानांची रचना आणि काम हे वेगवेगळं असतं.

प्रवाशी विमान हे सर्वसामान्यपणे 30 हजार ते 40 हजार फूट उंचीवरून उड्डाण करतं. एवढ्या उंच हवेत ऑक्सिजनची पातळी ही अतिश्य कमी असते, तसेच तापमान देखील शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं, त्यामुळे जर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने पॅराशूटच्या मदतीने विमानातून जंप केली तर कोणतंही ट्रेनिंग नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्याला हवेत श्वास घेता येणार नाही, तसेच अचानक त्याच्या शरीरातील तापमान कमी होईल, अशा परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच विमानाचा वेग हा ताशी 800 ते 900 प्रति तास किमी एवढा प्रचंड असतो, अशा स्थितीमध्ये जर एखाद्या प्रवाशाने विमानातून उडी मारली तर त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच विमानात शेकडो प्रवाशी असतात, विमानाच्या दरवाजाची आणि खिडक्यांची रचना अशी असते की ते लवकर उघडत नाहीत. जर चुकीच्या वेळी उघडले गेले तर मोठा अपघात होऊ शकतो, त्यामुळे विमानात पॅराशूट ठेवण्यात येत नाही.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर