AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवं हे गाव लई न्यारं… जातीला मातीत घालणारं भारतातील पहिलं गाव; महाराष्ट्रातील या गावाने…

राज्यातील एका गावाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या गावाने थेट जातमुक्त गावाचा ठराव मांडला असून त्याला संपूर्ण गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

| Updated on: Feb 11, 2026 | 6:42 PM
Share
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव हे कायमच समाजहिताचे, प्रगत आणि प्रेरणादायी निर्णय घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. याआधी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आले आहेत.

1 / 7
आता या गावाने सामाजिक समतेच्या दिशेने आणखी एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल टाकत ‘जातमुक्त गाव’ होण्याचा ठराव एकमुखी मंजूर केला आहे. सौंदाळा गावाच्या ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा, म्हणजेच जातमुक्त गावाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता या ठरावाला संपूर्ण पाठिंबा दिला.

2 / 7
या निर्णयामुळे सौंदाळा गाव राज्यातच नाही तर देशभरात सामाजिक एकतेचा आदर्श ठरणार आहे. या ठरावानुसार, सौंदाळा गावामध्ये यापुढे जात, पंथ, धर्म किंवा वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

3 / 7
गावातील सर्व नागरिक समान असून, ‘माझी जात – मानव’ ही भावना स्वीकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आंतरजातीय विवाहांना पूर्णपणे मान्यता देण्यात आली असून अशा विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

4 / 7
गावातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय योजना, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच सण-उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद केला जाणार नाही. प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान वागणूक आणि समान संधी देण्याचा संकल्प या ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

5 / 7
डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर वाढत असताना, जातीय द्वेष पसरवणाऱ्या संदेशांनाही आळा घालण्याचा ठोस निर्णय सौंदाळा ग्रामसभेने घेतला आहे.

6 / 7
कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावर जातिभेद करणारे, द्वेष निर्माण करणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पोस्ट केल्यास, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या ठरावात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारासोबतच ऑनलाईन माध्यमांमध्येही समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

7 / 7
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...