National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

स्वयंम पाटीलच्या यशाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त करत त्याला मिळालेला पुरस्कार हा नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे म्हटले आहे.

National Children's Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; 'स्वयंम'च्या यशाने पंतप्रधानही भारावले...!
नाशिकच्या स्वयंम पाटील याचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पंतप्रधानांच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देत गौरव केला.
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 10:18 AM

नाशिकः जलतरणात उत्कृष्ट कामगिरी करून देशविदेशात छाप पाडणाऱ्या नाशिकच्या स्वयंम पाटील या क्रीडापटूचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार (National Children’s Award ) देत गौरव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यपप्रणालीद्वारे आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी दूरदृष्यपप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त महिला व बालविकास चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गणेश कानवडे, पर्यविक्षा अधिकारी प्रभाकर गावित, पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांची आई विद्या पाटील व वडील विलास पाटील उपस्थित होते.

हा केला विक्रम

शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य, समाजसेवा आणि नवतंत्रज्ञान अशा सहा क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. देशातील 29 मुलांना प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृयश्प्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील स्वयंम पाटील या 14 वर्षीय बालकाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 देवून सन्मानीत केले. यावर्षी प्रथमच कानपूर आयआयटीमार्फत ब्लॉकचेन माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भ्रमणध्‍वनीवर डिजिटल प्रमाणपत्र व एक लाख रुपये रोख रक्कम पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

लिमका बुक ऑफ रेकॉर्ड

स्वयंम पाटील यास यापूर्वी देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्ड 2017, दिव्यांगजन सशक्तीकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार 2018, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड 2018, जिल्हा क्रीडा पुरस्कार 2020 तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वयंम पाटील व त्याचे आई वडील यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

पालकमंत्र्यांकडून कौतुक

स्वयंम पाटीलच्या यशाबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त करत त्याला मिळालेला पुरस्कार हा नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे म्हटले आहे. भुजबळ म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य, समाजसेवा आणि नवतंत्रज्ञान अशा सहा क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील स्वयंम पाटील या 14 वर्षीय बालकाने केलेल्या विक्रमाची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देवून सन्मानीत केले. ही बाब नाशिक करांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, पुरस्कार विजेत्या बालकांचे देखील अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.