AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री

राज्य सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात शिंदे गटाला आणि विशेषत: मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा झटका बसला आहे. 

अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा 'हा' नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
Image Credit source: tv9
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 14, 2023 | 4:47 PM
Share

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यासाठी खातेवाटप कधी होईल? असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडून 12 दिवस उलटले तरी त्यांच्यासाठी खातेवाटप जारी करण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर अतिशय जलद हालचाली सुरु होत्या. तसेच वरिष्ठ सूत्रांनी काल टीव्ही 9 मराठीला याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. नव्या मंत्र्यांसाठी पुढच्या 24 तासात खातेवाटप जाहीर होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली होती. विशेष म्हणजे आता याच बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्य सरकारकडून अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात शिंदे गटाला आणि विशेषत: मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा झटका बसला आहे.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हातून अखेर कृषीमंत्रीपद निसटलं आहे. कृषीमंत्री म्हणून त्यांची वर्षभराची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ मंत्र्यांनी कृषी खात्याची जबाबदारी सरकारमध्ये सामील झालेले नवे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्री संजय राठोड आणि मंत्री अतुल सावे यांनादेखील झटका

विशेष म्हणजे या खातेवाटपात आणखी दोन मंत्र्यांना झटका बसला आहे. मंत्री संजय राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन हे खातं होतं. पण त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांच्या हातून देखील हे खातं निसटलं आहे. संजय राठोड यांना आता मृदा व जलसंधारण खातं देण्यात आलं आहे. तर मंत्री अतुल सावे यांच्याकडून सहकार खातं काढून घेण्यात आलं आहे. सावे यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची जबाबदारी मिळाली आहे.

कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती, वाचा सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण धनंजय पंडितराव मुंडे – कृषि सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन उदय रविंद्र सामंत- उद्योग प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...