बीचवर अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करायला गेले पण पुढे भयंकर…; 7 पैकी 4 जण दगावले, नेमकं काय घडलं?

मनोरी बीचजवळ मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करण्यासाठी गेलेल्या 7 जणांच्या टोळीतील 4 जणांचा स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बीचवर अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करायला गेले पण पुढे भयंकर...; 7 पैकी 4 जण दगावले, नेमकं काय घडलं?
Manori Oil Ship Explosion
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 7:51 PM

मुंबईच्या मनोरी येथे अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करण्यासाठी गेलेल्या चार चोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चोरांनी छोट्या बोटीच्या सहाय्याने मनोरी बीचवर मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपवर यापूर्वी अनेक वेळा चोरी केली होती. त्यानंतर पुन्हा सात जणांची टोळी चोरी करण्यासाठी बोटीने शिपवर पोहोचली होती. त्यापैकी तीन जण बाहेर होते आणि चार जण आतमध्ये गेले होते, त्याचवेळी आतमध्ये काहीतरी स्फोट झाला ज्यात चार चोरांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यातील एकाने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. मात्र मनोरी समुद्रात मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपजवळ गोराई पोलिस, कोस्टगार्ड आणि नेव्हीची टीम दाखल झाली असून प्रकरणाचा तपास करत आहे.

नेमकं काय घडलं?

या चोरांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे चोराी केली करायचे नियोजन केलेले नव्हते, पण तरीही ही ही घटना घडली. सात जणांनी पुन्हा एकदा ऑईल शिपवर जाऊन आईलची चोरी करायची असं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं पण यावेळी त्यांच्यासोबत भयंकर घडणार असल्याची त्यांना कल्पनाही नव्हती. या घटनेनंतर स्वतः चोरांपैकी एका सदस्याने ही माहिती पोलिसांना कळवली.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us