AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला

मुंबई: मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. गुणरत्न सदावर्ते हे  माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. वैजनाथ पाटील असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. तो मूळचा जालन्यातील मराठा संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती […]

मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई: मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. गुणरत्न सदावर्ते हे  माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. वैजनाथ पाटील असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. तो मूळचा जालन्यातील मराठा संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. पण मराठा आरक्षणानंतर राज्याचे एकूण आरक्षण हे 68 टक्क्यांवर गेले आहे. याच संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी  3 डिसेंबर रोजी याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणं हे संविधानाच्या तरतुदींविरोधात असल्याचं सांगत, अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका सादर केली आहे.

मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतर सदावर्ते कोर्टाबाहेर येताच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या वकिलांनी हल्लेखोराला पकडून चोप दिला.

एक मराठा, लाख मराठाची घोषणा दिली आणि गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला चढवला

हल्लेखोराने एक मराठा, लाख मराठाची घोषणा दिली आणि गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला विरोध का? आमची मागणी मराठा आरक्षणाची आहे, त्याला तुम्ही विरोध का करता, असं हा तरुण ओरडत होता.

29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले. या विधेयकाला सर्व विरोधकांनीही पूर्ण पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषद अशा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं. त्यानंतर राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर झालं. 1 डिसेंबरपासून हे आरक्षण मराठ्यांना लागू झालं.

हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मारहाण, वकिलांवर गुन्हा दाखल होणार का?

कोण आहेत गुणरत्न सदावर्ते? अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षण 1 डिसेंबरपासून लागू झालं आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण सुरु झालं आहे. मात्र त्याला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली. मराठा आरक्षण असंवैधानिक आहे, त्यामुळे ते मंजूर करु नये, यासाठी अॅड. सदावर्ते यांनी राज्यपालांकडे विनंती पत्र पाठवलं होतं. मात्र त्यापूर्वीच राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केली होती.

गुणरत्न सदावर्तेंची ओळख अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते आहेत.

त्यांनी यापूर्वी SC/ST मधील मूळ पदावर पाठवलेल्या 151 पीएसआयच्या बाजूने खटला लढला होता.

गुणरत्न सदावर्ते मूळचे नांदेडचे आहेत, पण ते मुंबईतच राहतात.

मराठा आरक्षणविरोधी याचिका केल्याने त्यांना असंख्य धमक्या आल्या आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आणि पीएचडी पूर्ण केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी दंतचिकित्सेचीही पदवी मिळवली आहे.

गुणरत्न सदावर्तेंवरील हल्ल्याची चौकशी करणार

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील हल्ल्याची राज्य सरकार चौकशी करणार आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांने हे केलंय की मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडला आहे, याची चौकशी करु, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली.

शांताराम कुंजीर, मराठा आंदोलक यांची प्रतिक्रिया

“गुणरत्न सदावर्ते यांनी हे सर्व प्रसिद्धीसाठी केले आहे. कष्टाने मिळवलेल्या आरक्षणाला खोडा घालण्याचे काम आहे. वैजनाथ जर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. मात्र त्याला मारहाण करणाऱ्या वकिलांवर कारवाई झाली पाहिजे. वैजनाथ हा पुण्यातील संवाद यात्रेत सहभागी झाला होता. सदावर्ते यांच्याकडून नेहमी चिथावणीखोर वक्तव्य केली जातात”.

प्रविण गायकवाड, समनव्यक, मराठा क्रांती मोर्चा यांची प्रतिक्रिया

– गेल्या 38 वर्षांपासून आरक्षणासाठी लढाई सुरू आहे, त्यामुळे मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे,  गुणरत्न सदावर्ते हे बौद्ध समाजाचे आहेत, त्यामुळे सरकार आता मराठा आणि बौद्ध असा संघर्षं लावून देत आहे, मराठा तरुणांनी शांतता राखण्याचे आवाहन

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही : हायकोर्ट 

मराठा आरक्षण : सरकारची बाजू हरिश साळवे मांडणार  

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.