AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mhada Lottery : दिवाळीत निघणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीबाबत महत्त्वाची अपडेट!

म्हाडाच्या दिवाळीत निघणाऱ्या लॉटरीची तुम्हीही वाट बघताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!

Mhada Lottery : दिवाळीत निघणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीबाबत महत्त्वाची अपडेट!
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Oct 17, 2022 | 10:21 AM
Share

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : गृहस्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा लॉटरी 2022 च्या (MHADA Lottery 2022) प्रतिक्षेत तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चार हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी दिवाळीत (Diwali Mhada Lottery) निघण्याची शक्यता होती. मात्र ही शक्यता आता जवळपासून धुसर झाली आहे. दिवाळीमध्ये म्हाडा लॉटरी निघणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीच्या सॉफ्टवेअरचं (Mhada Lottery Software) काम सध्या सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात असलं तरी अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे दिवाळीत सुरु होणारी लॉटरीची प्रक्रिया यंदा पुढे ढकलण्यात आलीय.

म्हाडाची लॉटरी पुढे ढकलण्यात आल्यानं सर्वसामान्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर निघणाऱ्या म्हाडा लॉटरीच्या प्रक्रियेलाही यंदा फटका बसलाय. त्यामुळे इच्छुक ग्राहकांचाही हिरमोड झालाय. दरम्यान, आता 4 हजार म्हाडाच्या घरांची लॉटरी केव्हा निघते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पाहा व्हिडीओ :

म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची सोडत आता केव्हा निघणार, याबाबत लवकरच म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जारी करण्यात येईल. चार हजार घरांच्या सोडतीची जाहिरातही लवकरच काढली जाईल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. सॉफ्टवेअरचं काम पूर्ण झालं, ही सोडत प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, असं सांगितलं जातंय.

सॉफ्टवेअरमध्ये बदल

दरम्यान, नव्या सॉफ्टवेअर प्रणाली प्रमाणे आता म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना काही बदलही करण्यात येणार आहेत. फ्रि प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, आता म्हाडाच्या लॉटरीसाठी फॉर्म भरताना काही कागदपत्रांची पूर्तता थोडी अर्ज भरणाऱ्यांना आधीच करावी लागणार आहे.

याआधी लॉटरी लागल्यानंतर ज्या कागदपत्रांची पूर्तता लोकांना करावी लागत होती, ती कागदपत्रही लॉटरीचा फॉर्म भरतानाच मागवून घेतली जाणार आहेत. त्या धर्तीवरच अर्ज भरलेल्यांचे फॉर्म स्वीकारले किंवा नाकारले जातील.

ऑनलाईन फॉर्म भरताना ओळखपत्र, पत्ता, उत्त्पन्नाचे कागदोपत्री पुरावे, जात प्रमाणपत्र, ज्या वर्गातून अर्ज भरावयाचा आहे, त्या विशेष प्रभागाचं सर्टिफिटेक ही सगळी कागदपत्र ऑनलाईन भरावी लागतील. म्हाडाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी ‘ह्युमन इंटरफेअर’ लॉटरी प्रक्रियेत कसा ठेवता येईल, या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा