AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | “जे बोलले त्यांची स्थिती काय?”, त्या टीकेवरुन राज ठाकरे नाव न घेता आदित्य ठाकरे यांंच्यावर बरसले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचं दादरमधील शिवाजी पार्क इथे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राजकीय स्थितीवर भाष्य केलं.

Raj Thackeray | जे बोलले त्यांची स्थिती काय?, त्या टीकेवरुन राज ठाकरे नाव न घेता आदित्य ठाकरे यांंच्यावर बरसले
| Updated on: Mar 22, 2023 | 9:21 PM
Share

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी युवासेनाप्रमुख आणि विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला जसाश तसं उत्तर दिलं आहे. हा संपलेला पक्ष आहे का, गर्दी पाहा आणि जे म्हणाले त्यांची स्थिती काय, असं म्हणत राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.  तसेच तुमची स्थिती काय आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे दादरमधील शिवतिर्थावर (शिवाजी पार्क) इथे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.

“बऱ्याच काळानंतर बोलतोय. अनेकांनी मला विचारलं की, एवढे मोठे स्क्रिन कशासाठी लावले आहेत? मी म्हटलं, भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहेत. काहीतरी उद्देश असेल म्हणून तर लावले ना? पण आज शिवतीर्थाचा कोपरा न कोपरा भरलेला मला दिसतोय. अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे. हा? जे बोलले त्यांची अवस्था काय?”, अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे काय बोलले होते?

राज्यात एप्रिल 2022 मध्ये मनसेने मशिदीवरील भोंग्यांवरुन रान पेटवलं होतं. तेव्हा हा मुद्दा प्रचंड गाजला होता. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी मनेसेने अल्टिमेटम दिला होता. या वेळेत भोंगे काढले नाहीत, तर आम्ही भोंग्यावर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका मनसेने घेतली होती. यावर मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना मनसेवर टीका केली होती.

“विरोधक आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही काम करतोय ते दिसतंय. संपलेल्या पक्षांवर वक्तव्य करत नाही. ‘रघुकुल रीत सदा चली आये प्राण जाये पर वचन ना जाये’ जनतेला दिलेली वचने आम्ही पूर्ण करत आहोत. मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता.

आदित्य ठाकरे हे लोअर परळ पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पूलाचं कामकाजाची पाहणी करायला आले होते. यावेळेस त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया देत मनसेवर जळजळीत टीका केली होती.

ठाणे शहरातील गडकरी रंगायतन इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसेप्रमुखांनी राज्यातील सद्यपरिस्थितीवर गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात भाष्य करणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया देणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितंलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांनी चिरफाड केली.

एडगुरु भरत दाभोळकर यांचा मनसेप्रवेश

या मेळाव्याच्या आधी प्रसिद्ध एडगुरु भरत दाभोळकर यांनी मनसेत प्रवेश केला. “मला गर्दी पाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. त्यांच्या सभेला अशीच गर्दी व्हायची. त्यानंतर अशी गर्दी मी पाहिली नाही”, अशी प्रतिक्रिया दाभोळकर यांनी दिली.

मंचाच्या दोन्ही बाजूला 2 एलईडी स्क्रीन

मुख्य मंचाच्या दोन्ही बाजूला एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. या स्क्रीनवर मनसेकडून काय काय दाखवलं जाणार, याबाबत राज्याच्या जनतेला उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान मनसेच्या या मेळाव्यात एकमेव आमदार राजु पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, संदीप दळवी आणि इतर नेते या मेळाव्याला उपस्थित होते.

Follow Us
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची...
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची राजकारणात चर्चा!