मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलदर वाढले, ऐरोली टोलनाक्यावर मनसेच्या ‘खाली डोकं वर पाय’च्या घोषणा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि महागाईला सर्वसामान्य जनता सामोरी जात असतानाच मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलदर वाढले, ऐरोली टोलनाक्यावर मनसेच्या 'खाली डोकं वर पाय'च्या घोषणा
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 2:17 PM

नवी मुंबई : मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलदरात वाढ झाल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक पवित्रा घेत ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन केले. टोल दरामध्ये 5 ते 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ‘या सरकारचे करायचं काय? खाली डोकं वरती पाय’ अशी घोषणाबाजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली टोल नाक्यावर केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. (MNS Protest at Airoli Toll Naka against increase in Toll)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि महागाईला सर्वसामान्य जनता सामोरी जात असतानाच आजपासून (गुरुवार 1 ऑक्टोबर) टोलच्या दरात वाढ झाली आहे. टोलदरात पाच ते 25 रुपयांची वाढ झाली असून मासिक पासही महागला आहे. त्यामुळे दररोज मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नाही, मात्र टोलदरात वाढ होत असल्याने वाहनचालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या टोलनाक्यांवर नवीन दर काय

*छोटी वाहने – 40 रुपये *मध्यम अवजड वाहने – 65 रुपये *ट्रक आणि बसेस – 130 रुपये *अवजड वाहने – 160 रुपये *हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ *पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 वर

(MNS Protest at Airoli Toll Naka against increase in Toll)

संबंधित बातम्या :

रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

(MNS Protest at Airoli Toll Naka against increase in Toll)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.