AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक’, ‘मराठी’साठी मनसेचा इशारा

"आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु", असा इशारा मनसेने दिला आहे (MNS warn to Disney Hotstar).

'आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक', 'मराठी'साठी मनसेचा इशारा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 21, 2020 | 11:33 AM
Share

मुंबई : “आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल”, असा इशारा मनेसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे दिला आहे. मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईक यांनी ट्विटवरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर पत्राचा फोटोदेखील शेअर केला आहे (MNS warn to Disney Hotstar).

“आयपीएल क्रिकेट सामान्यांचं समालोचन मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करु, पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या”, असादेखील इशारा मनसेचे केतन नाईक यांनी दिला (MNS warn to Disney Hotstar).

“डिस्ने हॉटस्टार या ओ.टी.टी. व्यासपीठावर आयपीएलचे टी-20 सामने दाखविण्यात येत आहेत. हे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाचे समालोचन त्यांच्या पसंतीच्या भाषेत ऐकण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कनडा आणि बंगाली भाषा निवडण्याचा पर्याय आहे. पण महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही”, असं मनेसेने पत्रात म्हटलं आहे.

“डिस्ने हॉटस्टारचं मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आहे. विशेष म्हणजे आयपीएलचे टी-20 सामने पाहणारा मराठी भाषिक प्रेक्षकवर्ग जास्त असताना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडला. मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला गेला”, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

मनसेकडून याआधी ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीला पत्र पाठवण्यात आलं होतं. अ‍ॅमेझॉनमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली होती. ही मागणी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी मान्य केली आहे. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी अ‍ॅमेझॉनचे शिष्टमंडळ मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अ‍ॅमेझॉननंतर मनसेने डिस्ने हॉटस्टारकडे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी पत्र पाठवलं आहे.

हेही वाचा :

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...