AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरे गौतम अदानी यांचं विमान वापरायचे’, मोहित कंबोज यांचा मोठा आरोप

भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे हे उद्योगपती गौतम अदानी यांचं खासगी विमान वापरायचे, असा दावा मोहित कंबोज यांनी केलाय. "धारावी पुनर्विकास प्रकल्पात कमिशन मिळवण्यासाठीच ठाकरेंचा अदानींना विरोध होतोय", असा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.

'उद्धव ठाकरे गौतम अदानी यांचं विमान वापरायचे', मोहित कंबोज यांचा मोठा आरोप
Mohit Kamboj and Uddhav ThackerayImage Credit source: TV9MARATHI
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 17, 2023 | 5:34 PM
Share

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन उद्योगपती गौतम अदानी आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार मोर्चा सुरु केलाय. उद्धव ठाकरेंनी अदानी उद्योग समूहाच्या विरोधात धारावी ते बीकेसीपर्यंत भव्य पायी मोर्चादेखील शनिवारी (16 डिसेंबर) काढला. त्यांनी मोर्चानंतर केलेल्या भाषणात भाजप आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल रात्री एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. “उद्धव ठाकरेंना अदानींकडून 10 अब्ज रुपयांची वसूली करायची आहे. उद्धव यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचं आहे, ज्याचं डील काही दिवसांपूर्वी छोटे ठाकरेंनी केली आहे”, असा धक्कादायक दावा मोहित कंबोज यांनी ट्विटवर केला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंबद्दल मोठा दावा केला आहे.

“उद्धव ठाकरे उद्योगपती गौतम अदानी यांच्या खासगी विमानाचे वापर करायचे. ठाकरेंनी दिल्ली आणि संभाजीनगरला जाण्यासाठी अदानींचं विमान वापरलं होतं. विमान वापरल्याचे पैसे दिले नाहीत”, असे आरोप मोहित कंबोज यांनी केले आहेत. “धारावी पुनर्विकास प्रकल्पात कमिशन मिळवण्यासाठीच ठाकरेंचा अदानींना विरोध होतोय”, असाही आरोप मोहित कंबोज यांनी केलाय. मोहित कंबोज यांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

मोहित कंबोज व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?

“उद्धवजी या मागचं कारण काय आहे ते तर सांगा. गौतम अदानी कालपर्यंत तुमचे प्रिय मित्र होते. तुम्ही एकमेकांचे मित्र होते. अदानी तुमच्या घरी यायचे, तर कधी तुम्ही अदानींच्या घरी जायचे. आता तुम्ही त्यांचे एवढे विरोधक कसे बनले?”, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला. “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अनेक वेळा गौतम अदानी यांच्याकडून फायदा करुन घेतलाय. तर मग आता कोणत्या टीडीआरच्या माध्यमातून वसुली पाहिजे की मातोश्री 3 बनवायचं आहे?”, असा खोचक सवाल मोहित कंबोज यांनी केला.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत