AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत फिरताय?, या कोरोना प्रतिबंधित विभागात जाऊ नका; कंटेन्मेंट झोन आता गुगल मॅपवर

कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची अद्ययावत माहिती जाणून घेण्याची सोय आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

मुंबईत फिरताय?, या कोरोना प्रतिबंधित विभागात जाऊ नका; कंटेन्मेंट झोन आता गुगल मॅपवर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 08, 2020 | 6:23 PM
Share

मुंबई : अवघ्या जगाचा डिजीटल वाटाड्या म्हणून ओळख असलेल्या गुगल मॅपवर मुंबईतील (Mumbai Corona Containment Zone On Google Map) कोरोना प्रतिबंधात्मक परिसरांची अद्ययावत माहिती जाणून घेण्याची सोय आता नागरिकांना उपलब्ध झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित ही सेवा उपलब्ध करुन देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेला गुगलने पूर्ण सहकार्य केले. त्याचा मोबदला घेतलेला नाही. महानगरपालिकेची ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात अवतरली असून त्यामध्ये आणखी नाविण्य आणण्यात येईल. त्याचे महत्त्व पाहता जगातील इतर शहरांनीही आता त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे (Mumbai Corona Containment Zone On Google Map).

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची आणि अथक प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेने पाठोपाठ जागतिक बँकेने देखील वाखाणणी केली आहे. या उपाययोजना करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पारदर्शकपणे माहिती पुरवण्यातही बृहन्‍मुंबई महानगरपालिका अग्रभागी आहे. महानगरपालिकेची रुग्णालयं, कोविड सेंटर्स, इतर कामे या सर्वांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शक्य तिथे करण्यात येत आहे. यातून अचूकता, पारदर्शकता राखून वेगवान कार्यवाही करण्यासाठी मदत होते आहे. वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, निरनिराळ्या प्रसारमाध्यमातून, समाजमाध्यमांतून नियमितपणे प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे कोरोना संसर्गाची नेमकी स्थिती काय आहे, तेदेखील नागरिकांपर्यंत पोहोचते.

कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अवाढव्य मुंबई महानगरात अशा प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना ठाऊक असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन नियमितपणे प्रकाशित करण्यात येते. या संकेतस्थळावर मुंबईतील 24 विभागनिहाय नकाशांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्रदेखील दर्शविण्यात येतात. असे असले, तरी प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सहजसोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, त्याची व्यापकता वाढावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुगल मॅपची मदत घेण्याचे ठरवले. गुगलला देखील ही कल्पना आवडली आणि त्यांनी गुगल मॅपवर या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखित नकाशे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे (Mumbai Corona Containment Zone On Google Map).

महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून वेळोवेळी पुरवल्या जाणाऱ्या अद्ययावत माहितीनुसार, हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहता येतील. त्यासाठी मोबाईलवर गुगल मॅप हे अॅप्लीकेशन सुरु केल्यानंतर “कोव्हिड 19 इन्फो” हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मुंबई महानगराचा नकाशा “झूम” करुन पाहताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात आणि कोव्हिड 19 कन्टेन्मेंट झोन या उपशीर्षकासह दिसू लागतात. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. यामुळे आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही, असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे, हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे. नुकतीच ही सुविधा सुरु झाली असून त्यामध्ये वेळोवेळी अद्ययावत बदल केले जातील.

गुगल मॅपवर “कोव्हिड 19 इन्फो” हा पर्याय निवडल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका या पर्यायावर क्लिक केले तर थेट महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर stopcoronavirus.mcgm.gov.in या पृष्ठावर कोरोना विषयक माहिती देखील पाहता येते.

गुगलसोबत मिळून महानगरपालिकेने याआधी इतरही उपक्रम राबविले आहेत. गुगल सर्च इंजिनमध्ये मुंबई कोरोना व्हायरस अपडेटस् असे टाईप करताच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन तसेच समाजमाध्यम स्थळांवरुन (सोशल मीडिया) विशेषत: ट्‍विटरवरुन प्रसारित होणारी माहिती प्रकट होते. कोरोनाविषयक रुग्णसंख्या, रुग्णालयं, रुग्णशय्या, वेगवेगळ्या आकडेवारीचे विश्लेषण या सर्वांचा डॅशबोर्ड माहिती स्वरुपात संकेतस्थळावर दररोज उपलब्ध करुन दिला जातो. हा डॅशबोर्ड इतका माहितीपूर्ण आणि समजण्यास सहजसोपा आहे की त्याचे इतर शहरांनीही अनुकरण केले आहे. त्यापाठोपाठ आता गुगल मॅपवर मुंबईने उपलब्ध करुन दिलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशेदेखील इतर शहरांच्या पसंतीस उतरले आहेत. यामुळे इतर शहरांच्या प्रशासनानेही गुगलसोबत मिळून त्याचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे.

Mumbai Corona Containment Zone On Google Map

संबंधित बातम्या :

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...