Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

मुंबईच्या चेंबूर परिसरात कोरोनाचे आणखी नवे 9 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर परिसरातील 56 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या (Mumbai Corona Patients Update) दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यापैकी राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. आज मुंबईच्या चेंबूर परिसरात कोरोनाचे आणखी नवे 9 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर परिसरातील 56 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर दादरमध्येही 5 नवे कोरोना रुग्ण (Mumbai Corona Patients Update) आढळले आहेत.

आकडा वाढण्याची शक्यता

मुंबईच्या चेंबूर इथल्या पी. एल. लोखंडे मार्ग झोपडपट्टीत हे 9 नवे कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पी.एल लोखंडे मार्ग झोपडपट्टी हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर असून ही चेंबूर परिसरातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. या परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या 9 रुग्णांवर सध्या चांदीवलीच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पी.एल लोखंडे मार्ग झोपडपट्टीत कोरोना रुग्ण आढळ्यानंतर 56 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर 160 जणांची चौकशी सुरु आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून चेंबूर पी.एल. लोखंडे मार्ग सील करण्याची मागणी आता (Mumbai Corona Patients Update) स्थानिक नेत्यांनी केली आहे.

दादरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर 

दादरमध्ये आज ‘कोरोना’चे पाच नवे रुग्ण आढळले आहेत. तर काल दादरमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात ‘शुश्रुषा’ हॉस्पिटलमधील दोन नर्स शिवाय 80 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. रुग्णालयातील 27 वर्षीय आणि 42 वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आले होते. आता दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

राज्यात कुठे किती नवीन कोरोना रुग्ण?

आज (11 मार्च) राज्यात 106 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 680 वर पोहोचला आहे.

राज्यात कुठे किती रुग्णांची वाढ?

  • मुंबई – 86
  • औरंगाबाद – 2
  • मालेगाव – 5
  • पनवेल – 2
  • कल्याण – 1
  • ठाणे  – 4
  • पालघर – 1
  • नाशिक – 2
  • अहमदनगर – 1
  • पुणे – 3
  • वसई विरार – 1
  • नागपूर – 2
  • कोल्हापूर – 1

Mumbai Corona Patients Update

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी, पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सर्दी, खोकल्यानं ग्रासलं, नाशिकमध्ये कोरोनाच्या भीतीने तरुणाचा गळफास

102 वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात, उपचारानंतर कोरोनामुक्त

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना पुणे पोलिसांचा मोठा दिलासा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI