मनसेचे डॅशिंग नेते नितीन नांदगावकरांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि मुंबईतील मराठी माणसांचे ‘मसिहा’ बनलेले नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून, ‘तुम्हाला तडीपार का करु नये?’ असे विचारण्यात आले आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर येथून दोन वर्षांसाठी तडीपारीचा इशारा पोलिसांनी नांदगावकर यांना दिला आहे. पोलिसांचे नांदगावकरांवर काय आरोप? “सर्वसामान्य नागरिकांना तुमची भीती वाटते. मुंबई, ठाणे आणि […]

मनसेचे डॅशिंग नेते नितीन नांदगावकरांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि मुंबईतील मराठी माणसांचे ‘मसिहा’ बनलेले नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून, ‘तुम्हाला तडीपार का करु नये?’ असे विचारण्यात आले आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पालघर येथून दोन वर्षांसाठी तडीपारीचा इशारा पोलिसांनी नांदगावकर यांना दिला आहे.

पोलिसांचे नांदगावकरांवर काय आरोप?

“सर्वसामान्य नागरिकांना तुमची भीती वाटते. मुंबई, ठाणे आणि पालघर येथील सर्व जनता तुमच्यामुळे भयभीत झालेली आहे. तुमच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोका आहे. मग तुम्हाला मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर येथून दोन वर्षांसाठी तडीपार का करु नये?” अशा आशयाची नोटीस मुंबई पोलिसांच्या डीसीपी झोन-6 ने नितीन नांदगावकर यांना पाठवली आहे.

नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांच्या डीसीपी झोन-6 ने तडीपारीची नोटीस पाठवल्यानंतर, सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अख्त्यारित एक समिती बनवण्यात आली असून, या समितीसमोर नितीन नांदगावकर यांना त्यांची भूमिका मांडता येणार आहे.

तडीपारीच्या नोटिशीवर नितीन नांदगावकरांची बाजू काय?

कोण आहेत नितीन नांदगावकर?

आक्रमक ‘महाराष्ट्र सैनिक’ आणि राज ठाकरेंचा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून नितीन नांदगावकर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य माणसांच्या समस्येला प्रसंगी धावून जाणाऱ्या आणि मुजोरांना मनसेस्टाईल दणका देणारे म्हणून नांदगावकर परिचित आहेत.

सोशल मीडियावर #IsupportNitinNandgaonkar मोहीम

मनसेचे महाराष्ट्र सैनिक अन्यायाला ‘वाचा’ फोडण्यासाठी मनसे सैनिकांबद्दल सरकार सूडबुद्धीने वागणार असेल तर आपण या महाराष्ट्र सैनिकाच्या पाठीशी ठाम उभं राहणं आवश्यक आहे, असे म्हणत मनसेचे कार्यकर्ते #IsupportNitinNandgaonkar हा हॅशटॅग वापरुन नितीन नांदगावकर यांच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

VIDEO : काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठीशी नांदगावकरांची बातचीत केली होती :