स्नेहा वाघ स्वतःपेक्षा लहान फैजल खानला करत होती डेट… कोणी केलेले गंभीर आरोप… काय होतं नेमकं प्रकरण?
2 वेळा घटस्फोट... त्यानंतर 10 - 12 वर्ष लहान अभिनेता फैजल खान याला स्नेहा वाघ करत होती डेट? कोणी केलेले अभिनेत्रीवर गंभीर आरोप? काय होतं नेमकं प्रकरण? स्नेहा वाघ ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे...

झगमगत्या विश्वातील कलाकार फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. पण मोठ्या पडद्यावर आनंदी आणि उत्साही दिसणारे चेहरे खासगी आयुष्यात मात्र मोठ्या संकटांचा सामना करत असतात. लव्हलाईफ, लग्न, घटस्फोट यांसारख्या कारणांमुळे सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. एक काळ असा देखील होता, जेव्हा मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री स्नेहा वाघ तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली. 2 वेळा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीचं नाव स्वतःपेक्षा 10 – 12 वर्ष लहान असलेल्या फैजल खान याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. यावर दोघांनी प्रतिक्रिया देखील दिलेली.
स्नेहा वाघ हिच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी अभिनेत्रीने अभिनेता अविष्कार दारव्हेकर याच्याशी लग्न केलं. अभिनेत्रीचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. नवऱ्याने अभिनेत्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला… त्यानंतर स्नेहाने घटस्फोटाचा निर्णय घेतला. पण या धक्क्यातून सावरायला अभिनेत्रीला फार वेळ लागला…
पहिल्या घटस्फोटानंतर स्नेहा हिने 2015 मध्ये अनुराग सोळंकी याच्यासोबत दुसरा संसार थाटला… पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही… लग्नाच्या 8 महिन्यांनंतर स्नेहा आणि अनुराग यांचा घटस्फोट झाला… अशात नाती स्नेहाच्या आयुष्यात वाईट ठरली.
दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर स्नेहा हिचं नाव तिच्यापेक्षा 10 – 12 वर्षांनी लहान असलेल्या फैजल खान याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. ‘चंद्रगुप्त मौर्य’ मालिकेत दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केलेली.. . फैजलची एक्स गर्लफ्रेंड मुस्कान कटारिया हिने स्नेहावर गंभीर आरोप केले होते. पण स्नेहा आणि फैजल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले… या प्रकरणामुळे स्नेहा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली.
खासगी आयुष्यात आलेल्या चढ – उतारानंतर अभिनेत्रीने आध्यात्माकडे मोर्चा वळवल्याचं चित्र दिसत आहे. धार्मिक स्थळी अभिनेत्री जात असते… तर एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणालेली, ‘नती आता माझ्यासाठी भीतीदायक झाली आहेत. मी स्वतःच्या जगात आनंदी आहे आणि मला आता ऐकटेपणा वाटत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
आता स्नेहा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आाहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
