VHP, बजरंग दलाच्या धमकीमुळे अखेर शेवटच्या क्षणी मुनव्वर फारुकीला वगळलं

कार्टर रोडवरील भामला फाऊंडेशनने या कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणात प्रदूषण वाढतय. त्या बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.

VHP, बजरंग दलाच्या धमकीमुळे अखेर शेवटच्या क्षणी मुनव्वर फारुकीला वगळलं
Munawar Faruqui
| Updated on: Jun 06, 2025 | 10:57 AM

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बुधवारी वांद्रे येथे एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं. पण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फारुकीच्या सहभागवर आक्षेप घेतला. बजरंग दल आणि विहिपच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा इशारा दिला. त्यानंतर अखेरच्या क्षणी मुनव्वर फारुकीला कार्यक्रमातून वगळण्यात आलं. कार्टर रोडवरील भामला फाऊंडेशनने या कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणात प्रदूषण वाढतय. त्या बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या कार्यक्रमाच सहआयोजक होते.

आयोजकांनी मुनव्वर फारुकीला कार्यक्रमातून वगळावं, असं VHP आणि बजरंग दलाने स्थानिक पोलिसांना पत्र दिलं होतं. फारुकीवर त्याच्या शो मध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप आहे. “आमचा कार्यक्रमाला विरोध नाही. आमचा त्या व्यक्तीला विरोध आहे. कायदा-सुव्यवस्था भंग होऊ नये अशी आमची विनंती होती. प्रशासनाने मुख्य आयोजकाशी बोलून त्या व्यक्तीला कार्यक्रमात येण्यापासून रोखावं. अन्यथा बजरंग दल आपलं काम करेल” असं बजरंग दलाच्या कोकण प्रांताचे सहसंजोयक गौतम रावारीया म्हणाले.


महिनाभर होता तुरुंगात

फारुकी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, असं भामला फाऊंडेशनचे साहेर भामला यांनी सांगितलं. त्यापेक्षा जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला. मुनव्वर फारुकी टीव्हीवरील काही रिएलिटी शो चा विजेता आहे. त्याने त्याच्या शो मध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपावरुन जानेवारी 2021 मध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली होती. महिनाभर तुरुंगात काढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. स्थानिक कोर्टात त्याच्या विरोधातील हा खटला प्रलंबित आहे. 26 मार्च 2024 रोजी बेकायद हुक्का पार्लरवर मारलेल्या धाडीच्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.