AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडकरीजी काळजी घ्या, पवारांचा आपुलकीचा सल्ला

मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आज भोवळ येऊन स्टेजवरच कोसळले. शिर्डीजवळच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादरम्यान, गडकरींना भोवळ आली. सध्या गडकरींची प्रकृती ठणठणीत आहे. प्रवास आणि व्यस्त कार्यक्रमामुळे गडकरींना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे. गडकरी हे या कार्यक्रमानंतर शिर्डीत साईंच्या दर्शनाला पोहोचले, त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. प्रकृती अस्वास्थानंतर त्यांचे […]

गडकरीजी काळजी घ्या, पवारांचा आपुलकीचा सल्ला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आज भोवळ येऊन स्टेजवरच कोसळले. शिर्डीजवळच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादरम्यान, गडकरींना भोवळ आली. सध्या गडकरींची प्रकृती ठणठणीत आहे. प्रवास आणि व्यस्त कार्यक्रमामुळे गडकरींना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे. गडकरी हे या कार्यक्रमानंतर शिर्डीत साईंच्या दर्शनाला पोहोचले, त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. प्रकृती अस्वास्थानंतर त्यांचे पुढील तीन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान गडकरींनीही आपली प्रकृती उत्तम असल्याचं ट्विट करुन सांगितलं. “शुगर कमी झाल्याने चक्कर आली, आत्ता तब्बेत बरी आहे.  डॉक्टरांनी तपासणी केली आहे. माझ्या हिंतचिंतकांचे मी आभार मानतो” असं ट्विट नितीन गडकरी यांनी केले.

गडकरींच्या काळजीपोटी दिग्गजांचे ट्विट

दरम्यान, नितीन गडकरी भोवळ येऊन कोसळल्याचं समजताच, देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या काळजीपोटी ट्विट करत, त्यांच्या उत्तम प्रकृतीची कामना केली.

शरद पवारांकडून विचारपूस

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींच्या प्रकृतीबाबत ट्विट करुन, उत्तम प्रकृतीचा कामना केली.  पवार म्हणाले, “कधीकधी कठोर परिश्रमाचा, अतिरिक्त कामाचा आरोग्यावर परिणाम होतो.  नितीन गडकरीजी कृपया काळजी घ्या. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा”

काँग्रेस नेते विजय दर्डा

“नितीन गडकरजींशी फक्त बोललो. ईश्वराचे आभार, ते ठीक आहेत. त्यांनी घातलेल्या कपडयांमुळे त्यांना घुटमळत होते असे त्यांनी सांगितले. त्यांच्या शरिरातील साखर कमी झाली. काळजी करण्यासारखं काही नाही. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो”

 अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

राजकीय, सामाजिक क्षेत्रात गडकरी काम करतात. आमचे राजकीय मतभेद असले तरी त्यांची तब्येत लवकरात लवकर नीट व्हावी. त्यांच्या तब्येतीला आराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सत्ताधारी पक्षाचे ते महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी तब्येत सांभाळावी जास्त दगदग कर नये.

संबंधित बातम्या

उभ्या उभ्या गडकरींचे डोळे फिरले आणि भोवळ येऊन पडले!  

नितीन गडकरी चक्कर येऊन कोसळले 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...