50 मिनिटाच्या खोळंब्यानंतर चाकरमान्यांची सुटका… सकाळी सकाळीच अ‍ॅक्वा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

आज सकाळीच अ‍ॅक्वा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो तब्बल अर्धा 50 मिनिटे एकाच जागी उभी होती. त्यानंतर काही वेळाने प्रवाशांनी सुटका झाली.

50 मिनिटाच्या खोळंब्यानंतर चाकरमान्यांची सुटका... सकाळी सकाळीच अ‍ॅक्वा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
Aqua Line
| Updated on: May 22, 2026 | 10:51 AM

मुंबईतील अ‍ॅक्वा लाईन 3 वर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे आली. जवळपास 40 ते 50 मिनिटांपासून मेट्रो एकाच ठिकाणी उभी होती. ज्यामुळे मोठा खोळंबा झाला. ऐन सकाळच्या वेळी मेट्रोचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांना अडकून पडावे लागले. एकाच ठिकाणी मेट्रो थांबवल्याने प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरणही बघायला मिळाले. मेट्रो स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळाली. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो एकाच ठिकाणी थांबलाची माहिती मिळत आहे. मात्र, नक्की काय घडले, याबाबत काही कारण पुढे येऊ शकले नाही. मेट्रो-3 भुयारी मार्गाने असल्याने यादरम्यान प्रवाशांच्या मोबाईलला नेटवर्क देखील मिळत नाही. मेट्रो थांबण्याचे कारणही प्रवाशांना कळत नव्हते, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रोला काही काळ तिथे थांबवण्यात आले.

अ‍ॅक्वा लाईन 3 मध्ये मोठा तांत्रित बिघाड 

Loading...

तब्बल 50 मिनिटांनंतर अ‍ॅक्वा लाईन 3 सुरू झाली. जवळपास 50 मिनिटानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र मेट्रो 3 काही मिनिटांनी उशिरा चालत आहे. मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बंद पडली. काही मोठा तांत्रिक बिघाड आल्याचे कळतंय. मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 ही थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडते.

50 मिनिटांनी प्रवाशांनी घेतला सुटकेचा निश्वास 

या बिघाडानंतर मेट्रोकडून यावर भाष्य करण्यात आले. तांत्रिक समस्येमुळे, आज सकाळी डाउनलाइन आणि अपलाइन दोन्ही मार्गांवरील रेल्वे सेवांना विलंब झाला होता. ही समस्या आता दूर करण्यात आली असून, रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे, असे सांगण्यात आले. मात्र, यादरम्यान प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

खोळंब्यानंतर चाकरमान्यांची सुटका

पूर्ण भुयारी रेल्वे असल्याने बाहेरचे काहीच दिसत नाही. शिवाय मोबाईलला नेटवर्कही मिळत नाही. मेसेज जाणेही कठीण होते. सकाळची वेळ असल्याने लोक ऑफिसकरिता निघाले होते. अचानक मेट्रो बंद पडल्याने अनेकांना ऑफिसला जाण्यास उशिरा झाला. एकाच जागी तब्बल 50 मिनिटे मेट्रो उभी होती. त्यानंतर तांत्रिक बिघाड हा दूर करण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us