AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाणेरडं लिंबू सरबत बनवणाऱ्या ‘त्या’ स्टॉल धारकाला पाच लाखांचा दंड

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर घाणेरडं लिंबू सरबत बनवणाऱ्या स्टॉल धारकावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असून त्याच्यावर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहा आणि सातवर असेलल्या स्टॉलवरील लिंबू सरबत हे निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलं होतं. या लिंबू सरबताच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी […]

घाणेरडं लिंबू सरबत बनवणाऱ्या 'त्या' स्टॉल धारकाला पाच लाखांचा दंड
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर घाणेरडं लिंबू सरबत बनवणाऱ्या स्टॉल धारकावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असून त्याच्यावर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहा आणि सातवर असेलल्या स्टॉलवरील लिंबू सरबत हे निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलं होतं. या लिंबू सरबताच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी कुर्ला स्थानकावरील लिंबू पाण्याच्या स्टॉलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्टॉलवर लिंबू पाणी अस्वच्छपणे बनवण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर विकल्या जाणाऱ्या खुल्या पेयांवर बंदी घातली. त्यानंतर प्रशासनाने स्टॉलवर विकण्यात येणाऱ्या लिंबू सरबताचे नमुने पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. या नमुन्यांच्या तपासणीत लिंबू सरबत निकृष्ट दर्जाचे असल्याचं आढळून आलं. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून स्टॉलधारकावर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर उष्णतेने हैराण झालेले मुंबईकर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टॉलमध्ये लिंबू सरबत, कोकम असे पेय पितात. पण हे पेय कसे बनवले जातात त्याचा एक व्हिडीओ समोर आला. कुर्ला स्टेशन फलाट क्र. 7 वरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुन्हा कधीही लिंबू सरबत पिण्याची इच्छा होणार नाही.

तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आयुष्यात कधीही रेल्वे स्टेशनवर लिंबू पाणी पिणार नाही

कुर्ला स्टेशनवर एका प्रवाशाने हा व्हिडीओ ट्विटरवर टाकला होता. रेल्वेकडून याची तातडीने दखल घेण्यात आली. रेल्वे अधिकारी स्टॉलवर गेले आणि त्यांनी पाण्याची तपासणी केली. स्टॉल चालकाचा दोष आढळून आल्यामुळे स्टॉल तातडीने बंद करण्यात आला आहे.

मुंबईतील जवळपास सर्व स्टेशनवर असे स्टॉल आहेत. त्यामुळे इतर स्टॉलवरही रेल्वेकडून आता तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्टॉलधारकांवर रेल्वेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या सतर्क प्रवाशामुळे ही घटना समोर आली.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात