AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीत किक मारली, थेट बाईकने बोईसरला, बाईकस्वाराला सर्दी- खोकल्याने प्रशासनाची धाकधूक

धारावीतील एक व्यक्ती मोटारसायकलने बोईसरला पोहचला. मात्र, त्याला कोरोना संसर्गाची लक्षणं दिसल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच धाकधूक वाढली आहे (Dharavi person travel to Boisar become Corona Suspect).

धारावीत किक मारली, थेट बाईकने बोईसरला, बाईकस्वाराला सर्दी- खोकल्याने प्रशासनाची धाकधूक
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 08, 2020 | 4:26 PM
Share

पालघर : राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मुंबई हा देशातील कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे. अशातच धारावीसारख्या प्रचंड लोकसंख्या घनता असलेल्या झोपडपट्टीभागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अशा स्थितीत धारावीतील एक व्यक्ती मोटारसायकलने बोईसरला पोहचला. मात्र, त्याला कोरोना संसर्गाची लक्षणं दिसल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच धाकधूक वाढली आहे (Dharavi person travel to Boisar become Corona Suspect).

संबंधित व्यक्ती मोटरसायकलने धारावीतून बोईसरला गेला. तेथे गेल्यावर त्याला सर्दी आणि कफ असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्याला बोइसर येथील एका खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आलं. यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. खासगी डॉक्टारांनी रुग्णाच्या लक्षणांची आणि तब्येतीची पूर्ण माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिली आहे. या व्यक्तीला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने संबंधित व्यक्तीचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवले आहेत. चाचणीच्या अहवालानंतरच रुग्णाची स्थिती स्पष्ट होणार आहे.

संबंधित धारावीतील व्यक्ती नाकाबंदी चुकवून बोईसरमध्ये आल्याने परिसरात चिंतेचं वातावरण आहे. मात्र, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नसून फक्त खोकला असल्याचा खुलासा केला आहे. तसेच खबरदारी म्हणून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत, असं सांगितलं.

दरम्यान, धारावीत कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यात धारावीतील व्यक्ती बाईसर भागात आल्याने चिंता  वाढली आहे. धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे 7 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या या ठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका प्रचंड वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही मंगळवारी (7 एप्रिलला) धारवीला भेट दिली आहे. त्यांनी याभागात सुरु असलेल्या सर्वेक्षण कामाचा आणि क्वारंटाईन सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.

राजेश टोपे यांनी धारावी भागातील कोरोना उपचारासाठीच्या हॉस्पीटलला भेट देऊन व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. टोपे यांनी धारावीमध्ये विलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कडक अमंलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

धारावी भागात 50 खाटांचे साई हॉस्पिटल केवळ कोरोना उपचारासाठी घोषित केले आहे. तेथे व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये 350 खाटांची विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भागात 3500 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अनेक संस्था, दानशूर व्यक्तींकडून याभागात धान्य, गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जात आहे. संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी त्यांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच नियमांच्या कडक अमंलबजावणीचे निर्देश दिले. या भागात असलेल्या सार्वजनिक स्वचछतागृहांमध्ये सातत्याने निर्जंतुकरणाची प्रक्रिया राबवावी अशा सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

कोरोना संसर्गाची अद्ययावत माहिती:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव, मुंबई, पुण्यासह राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली ‘फिव्हर क्लिनिक’ संकल्पना नेमकी काय?

तब्लिगींमुळे ‘कोरोना’चा फैलाव होण्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? अनिल देशमुखांचा शाहांवर निशाणा

Corona : ‘मद्यपान केल्याने कोरोना होत नाही’, अफवेने इराणमधील 600 जणांचा मृत्यू, 3000 जण रुग्णालयात

Dharavi person travel to Boisar become Corona Suspect

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती