AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना दिला होता ‘हा’ इशारा; ‘या’ नेत्याने केला गौप्यस्फोट

जेव्हा केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचं उत्तर का दिलं, यावरुन ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीसुद्धा नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना दिला होता 'हा' इशारा; 'या' नेत्याने केला गौप्यस्फोट
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 03, 2023 | 11:20 PM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांचे केंद्रीय मंत्रीपद काढून टाकण्याचा इशारा दिला होता असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राणे यांच्या पीएमुळे हा सारा प्रकार घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण तापले आहे, त्यावर आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना थेट मंत्रीपद काढून घेण्याचा इशारा दिला होता, असा खळबळजनक दावा खासदार विनायक राऊतांनी केला आहे.

कणकवलीतील कार्यक्रमात विनायक राऊत यांनी केलेला हा दावा चर्चेत आला आहे. राऊतांच्या दाव्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या खासगी सचिवानं अनेक लोकांना गंडा घातला असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबतच्या तक्रारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्या आहेत.

त्यावरुन त्या पीएला तातडीनं काढण्याच्या सूचना मोदी यांनी राणेंना दिल्या आहेत, तसं नाही झाल्यास तुमचं मंत्रीपद काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला असल्याचा सांगण्यात आले आहे. विनायक राऊत यांच्या या गौप्यस्फोटावर मात्र नितेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

याशिवाय विनायक राऊत यांनी संसदीय कामकाजावेळच्या दोन प्रसंगावरुन राणे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. गेल्या अधिवेशनात खासदार कनिमोळी यांनी इंग्रजीतून केलेल्या प्रश्नामुळे राणे बुचकळ्यात पडले होते, तेव्हापासून ते संसदेत गेलेच नसल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

दरम्यान याआधी जेव्हा केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचं उत्तर का दिलं, यावरुन ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीसुद्धा नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट