AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल महाजन यांचं तिसरं लग्न, 18 वर्षे लहान मुलीशी लगीनगाठ

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांनी तिसरं लग्न केलं आहे. कझाखस्तानची 25 वर्षीय मॉडेल नाताल्या इलिनासोबत त्यांनी लगीनागाठ बांधली. मलबार हिल इथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला केवळ 25 पाहुणे उपस्थित असल्याचं बोललं जातंय. अत्यंत खाजगी पद्धतीने राहुल यांचा हा विवाह पार पडला. राहुल महाजन यांनी लग्नाबाबत ‘मुंबई मिरर’शी बातचीत […]

राहुल महाजन यांचं तिसरं लग्न, 18 वर्षे लहान मुलीशी लगीनगाठ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजीव राहुल महाजन यांनी तिसरं लग्न केलं आहे. कझाखस्तानची 25 वर्षीय मॉडेल नाताल्या इलिनासोबत त्यांनी लगीनागाठ बांधली. मलबार हिल इथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला केवळ 25 पाहुणे उपस्थित असल्याचं बोललं जातंय. अत्यंत खाजगी पद्धतीने राहुल यांचा हा विवाह पार पडला.

राहुल महाजन यांनी लग्नाबाबत ‘मुंबई मिरर’शी बातचीत केली. “अगोदरचे दोन लग्न धुमधडाक्यात केले होते, पण ते नाते फार काळ टिकले नाही. त्यामुळे यावेळी कोणताही देखावा करायचा नव्हता. नाताल्याला एक वर्षांपासून ओळखत होतो आणि आम्ही एकमेकांना खुप चांगल्या पद्धतीने ओळखलं आहे. तिला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे आणि यामध्ये मी तिच्या सोबत असेल. फॅमिली लाईफसाठी मानसिक शांतता सगळ्यात महत्त्वाची असेल,” असं राहुल महाजन म्हणाले.

राहुल आणि नाताल्या यांच्या वयात 18 वर्षाचं अंतर आहे. राहुल यांचं वय 43 वर्षे, तर नाताल्याचं वय 25 वर्षे आहे.

राहुल महाजन हे बिग बॉसचे स्पर्धकही होते. त्यांचं पहिलं लग्न श्वेता सिंहसोबत झालं होतं. श्वेतासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसरं लग्न डिम्पी गांगुलीसोबत केलं. काही महिन्यातच डिम्पीने कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप करत हे नातं तोडलं. आता राहुल महाजन यांनी तिसरं लग्न नाताल्यासोबत केलं आहे.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.