AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार राजन विचारेंच्या नावे देणगी उकळणारे भामटे गजाआड

ठाणे : ठाण्यातील शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या नावाने व्यापाऱ्यांना फोन करुन देणगी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा भामट्यांना कासारवडवली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. राजेश मिश्रा आणि सिद्धेश सुधाकर सामंत अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाईनगर येथे राहणाऱ्या निखील रावराई या व्यापाऱ्याचे घोडबंदर रोड, […]

खासदार राजन विचारेंच्या नावे देणगी उकळणारे भामटे गजाआड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

ठाणे : ठाण्यातील शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या नावाने व्यापाऱ्यांना फोन करुन देणगी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा भामट्यांना कासारवडवली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. राजेश मिश्रा आणि सिद्धेश सुधाकर सामंत अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाईनगर येथे राहणाऱ्या निखील रावराई या व्यापाऱ्याचे घोडबंदर रोड, कावेसर येथे मिठाईचे दुकान आहे. मंगळवारी  दुपारी दुकानात असताना त्यांच्या मोबाईलवर आलेल्या फोनवर बोलणाऱ्या आरोपीने आपण खासदार राजन विचारे बोलतो आहे. आज बालदिन असल्याने अपंग मुलांना व्हीलचेअर वाटप करायचे आहे. त्यासाठी वडिलांचा नंबर द्या, अशी विचारणा केल्याने निखील याने आरोपीला वडिलांचा फोन नंबर दिला. त्या फोनवर आरोपीने संपर्क साधून 25 हजार रुपये देणगी देण्याची मागणी केली.

निखील याने घडलेली हकीकत वाघबीळच्या शिवसेना नगरसेवकाचा भाऊ रॉनी मणेरा यांना कळवली. त्यानंतर मणेरा यांनी सदर आरोपीशी संपर्क साधून पडताळणी केली. त्याचबरोबर 2 हजाराची पावती फाडण्याची विनंती केल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत संशय बळावला. त्यांनी खासदार विचारे यांचे कार्यालय गाठले. तेव्हा खासदार विचारे यांनी बालदिनानिमित्त असा कुठलाही कार्यक्रम आयोजित केला नसल्याची खात्री झाल्याने तडक कासारवडवली पोलीस ठाणे गाठून भामट्यावर गुन्हा दाखल केला.

त्यानुसार, पोलिसांनी फोन ट्रेप करून दोघाही भामट्यांना अटक केली. तर ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासात या आरोपींनी याआधी खासदार सुभाष देसाई आणि गोपाळ शेट्टी यांच्या नावाने देखील कॉल करुन व्यापाऱ्यांकडून पैसे उकळल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आता ठाणे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...