पदोन्नतीमधील आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आरपीआय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी निदर्शने करणार

| Updated on: Jul 01, 2021 | 6:05 PM

पदोन्नतीमधील आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी येत्या 6 जुलै रोजी आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करणार आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आरपीआय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी निदर्शने करणार
रामदास आठवले
Follow us on

मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी येत्या 6 जुलै रोजी आझाद मैदानात निदर्शने आंदोलन करणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. (RPI to protest during monsoon session of legislature for various demands including reservation in promotion)

अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे, अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आंदोलन सप्ताह

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 जून ते 7 जूनदरम्यान राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल, दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे, त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा आहे. हा अजेंडा शिवसेनेचा आहे की, राष्ट्रवादीचा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आठवले पवारांची भेट घेणार

पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha reservation)मुद्यावर रामदास आठवले (Ramdas Athavale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकारची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गंभीर इशारा रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आता त्यांचा पक्ष आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

इतर बातम्या

आरक्षणासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजही त्यांच्या पाठीशी : रामदास आठवले

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले, पण मी त्यासाठी केंद्रात प्रयत्न करेन; रामदास आठवलेंचं आश्वासन

(RPI to protest during monsoon session of legislature for various demands including reservation in promotion)