AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदोन्नती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रामदास आठवले शरद पवारांची भेट घेणार

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

पदोन्नती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रामदास आठवले शरद पवारांची भेट घेणार
Ramdas Athavale
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 7:29 PM
Share

मुंबई : पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकारची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गंभीर इशारा आज रामदास आठवले यांनी दिला. (Ramdas Athavale will meet Sharad Pawar on the issue of promotion and Maratha reservation)

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 जून ते 7 जूनदरम्यान राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला. यावेळी अॅड. अभयाताई सोनवणे यांच्यासह रिपाइचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल, दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे, त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा आहे. हा अजेंडा शिवसेनेचा आहे की, राष्ट्रवादीचा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

राज्यभर आंदोलन

पदोन्नतीमधील अरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बोरिवली तहसील आणि अंधेरी तहसील कार्यालयावर रिपाइंतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. अंधेरी तहसील कार्यालयावर मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पदोन्नतीमधील अरक्षणाच्या मागणीसाठी आज कल्याणमध्ये जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, तालुका अध्यक्ष रामा कांबळे, रमेश बर्वे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात आटपाडी तहसील कार्यालयावर विशाल काटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पंढरपूरसह अनेक जिल्हा तालुक्यात रिपाइंतर्फे पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारच्या कामगिरीवर नाखुश, रामदास आठवलेंच्या RPI कडून पर्यावरण विभाग सुरु

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा, रामदास आठवलेंची घोषणा

(Ramdas Athavale will meet Sharad Pawar on the issue of promotion and Maratha reservation)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.