ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले, पण मी त्यासाठी केंद्रात प्रयत्न करेन; रामदास आठवलेंचं आश्वासन

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले, पण मी त्यासाठी केंद्रात प्रयत्न करेन; रामदास आठवलेंचं आश्वासन
Ramdas Athavale
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 8:01 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. ओबीसींना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी मी केंद्र सरकारमध्ये प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिले आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची आणि रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आहे. (I will try my best at the center for OBC reservation says Ramdas Athawale)

ओबीसी आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा सदैव पाठिंबा राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची योग्य बाजू मांडली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले. त्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. असं रामदास आठवले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा विषय आपण मांडला होता. या पुढेही ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारमध्ये प्रयत्नशील राहणार असल्याचे, रामदास आठवले यांनी कळवले आहे.

मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजही त्यांच्या पाठीशी : आठवले

ग्रामीण भागातून मी आलो असल्याने गावात मराठा समाजाची सत्यस्थिती काय आहे, ती मला माहीत आहे. मराठा समाजात गरिबांची संख्या मोठी आहे. सर्व मराठा समाजाला नाही, मात्र गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याची मी मागणी केली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू नीट मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजदेखील सर्व ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

इतर बातम्या

रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी, जिल्हाध्यक्षाची खरमरीत टीका

आरक्षणासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजही त्यांच्या पाठीशी : रामदास आठवले

(I will try my best at the center for OBC reservation says Ramdas Athawale)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.