AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षणासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजही त्यांच्या पाठीशी : रामदास आठवले

सर्व मराठा समाजाला नाही, मात्र गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याची मी मागणी केली होती, असं रामदास आठवले म्हणाले.

आरक्षणासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजही त्यांच्या पाठीशी : रामदास आठवले
Ramdas Athavale
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : ग्रामीण भागातून मी आलो असल्याने गावात मराठा समाजाची सत्यस्थिती काय आहे, ती मला माहीत आहे. मराठा समाजात गरिबांची संख्या मोठी आहे. सर्व मराठा समाजाला नाही, मात्र गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याची मी मागणी केली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू नीट मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजदेखील सर्व ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. (All Maratha community came together for reservation then Dalit community also supports them: Ramdas Athavale)

नवी मुंबईतील माथाडी भवन हॉल मध्ये राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नरेंद्र पाटील, आमदार रमेश पाटील, सुरेश पाटील, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, सिद्राम ओव्हाळ, यशपाल ओव्हाळ, सचिन कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. या गोलमेज परिषदेस राज्यभरातील मराठा समाजाच्या 42 संघटना सहभागी झाल्या होत्या.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मोदींसमोर मांडला

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नुकताच मांडला आहे. मराठा समाजाप्रमाणे देशभरातील मराठा, जाट, रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला 12 टक्के आरक्षण दिले पाहिजे, या मागणीचा विचार करण्याची सूचना केली आहे. दलित अदिवासी ओबीसी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजातून होत आहे. त्यांच्या मागणीला दलित समाजाचा ही पाठिंबा आहे. मराठा समाजात काही प्रमाणात श्रीमंत मराठा समाज असला तरी गरीब मराठा बहुसंख्य असून समाजाला आरक्षणाची गरज आहे. ओबीसींप्रमाणे ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे अशा मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मोठे योगदान दिले आहे, त्यांची आठवण ठेवण्याचे आवाहन यावेळी रामदास आठवले यांनी केले.

या गोलमेज परिषदेत ना रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आपल्या खास शैलीत सादर केलेली बहारदार कविता आकर्षण ठरली. नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात नंबर लागणार आहे, त्यांचा नंबर लागला तर माझा ही केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी नंबर लागेल, असेही रामदास आठवले म्हणाले.

गोलमेज परिषदेत आठवले यांनी सादर केली कविता

मराठा समाजाचे खणखणीत नाणे त्यांचे नाव आहे नारायण राणे महाविकास आघाडीचे काम आहे फक्त खाणे आमचे काम आहे मराठा आरक्षणाचे गीत गाणे

मी लढा देणार आहे मराठा आरक्षणासाठी कारण मी आहे जातिवंत घाटी हातात घेऊन काठी मी तुमच्यासाठी लागणार आहे उद्धव ठाकरेंच्या पाठी

इतर बातम्या

रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी, जिल्हाध्यक्षाची खरमरीत टीका

बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!

All Maratha community came together for reservation then Dalit community also supports them: Ramdas Athavale)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.