AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साकीनाक्याचे पोलीस थेट गुजरातमध्ये घुसले… ड्रग्स माफियांना दणका, शहरात घुसून कारखानाच उद्ध्वस्त, मोठी कारवाई

Mumbai Police : मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला तालुक्यात सुरू असलेला मेफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

साकीनाक्याचे पोलीस थेट गुजरातमध्ये घुसले... ड्रग्स माफियांना दणका, शहरात घुसून कारखानाच उद्ध्वस्त, मोठी कारवाई
sakinaka police bust md drugs factoryImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 6:16 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्यासह देशातील अनेक भागात ड्रग्सची तस्करी वाढली आहे. अनेक तरूण-तरूणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला तालुक्यात सुरू असलेला मेफेड्रॉन म्हणजेच MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून 74 कोटी 76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुजरातमध्ये होता कारखाना

गेल्या काही काळापासून पोलिस ड्रग्ज तस्करांच्या मागावर होते. 21 एप्रिल 2026 रोजी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर 109 ग्रॅम मेफेड्रॉनसह मुस्कान समीर खान, वय 26, हिला अटक करण्यात आली होती. तिच्या चौकशीतून गुजरातमधील कारखान्याचा सुगावा लागला होता. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमधील मु. वरखड, ता. नांदोद, जि. नर्मदा येथे छापा टाकून MD बनवण्याचा कारखाना शोधून काढला आणि त्यावर कारवाई केली आहे.

कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

ड्रग्स प्रकरणातील दुसरा आरोपी वजूळ कमर अबुल वफा चौधरी उर्फ पप्पू, वय 56, याला 26 एप्रिल रोजी शिळफाटा येथून अटक करण्यात आली होती. त्यानेच गुजरातमधील घर भाड्याने घेऊन MD बनवण्याचा कारखाना सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत 20.040 किलो लिक्विड मेफेड्रॉन ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत 74.46 कोटी रुपये आहे, ते जप्त केले.

आगामी काळातही कारवाई सुरू राहणार

याशिवाय 2-Bromo-4-methylaniline, 4Methylpropiophenone, Monomethylamine, Bromin, Chloroform अशी विविध केमिकल्स, तीन स्टेअर मशिन, TATA Voltas चे 2 कमर्शिअल फ्रीज, गोलाकार फ्लास्क, हिटिंग मेंटल असा एकूण 74 कोटी 76 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांच्या या कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अंमली पदार्थांविरोधातील ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.

फलटणमध्ये 4 किलो गांजा जप्त

सातारा जिल्हा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश आले असून फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजासह एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 1 हजार 725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Follow Us
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात