AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊतांचे 10 मोठे हल्ले

संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली त्यातील प्रमुख मुद्दे Sanjay Raut Press Conference 10 Points

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊतांचे 10 मोठे हल्ले
संजय राऊत
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 28, 2020 | 2:42 PM
Share

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीच्या नोटीसीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे : (Sanjay Raut Press Conference 10 Points)

1. कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं, असं संजय राऊत यांनी भाजप(BJP) नेत्यांना ठणकावलं आहे.

2. गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती, कागदपत्र हवी आहेत. ती कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पुरवली. पण गेल्या ३ महिन्यात त्यांनी काहीही शंका व्यक्त केली नाही. भाजपची माकडं कालपासून उड्या मारत आहेत, असा जोरदार हल्लाबोल राऊत यांनी केला.

3. “माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत”. भारतीय जनता पार्टीचे माकड कालपासून उड्या मारत आहेत. त्यांना माहिती आहे का Ed च कार्यालय भाजपच्या कार्यालय थाटले आहे का? भाजपचे तीन नेते तिथून कागदपत्र काढतात आणि ते माहिती लीक करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

4. महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे. असं भाजप नेते म्हणत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

5. शिवसेनेच्या 22 लोकांच्या नावांची यादी दाखवली गेली त्या लोकांना ईडीच्या नोटिसा जारी करा त्यांच्यावर दबाव आणणं हे तंत्र अवलंबलं जातय, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला.

भाजपचं माकडं कालपासून नाचतायत, बाईच्या पदराआडून लढाई का? : संजय राऊत

6. सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते मला धमकावत आहेत, आम्हाला अटक करा सरकार पडणार नाही. बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही,असंही राऊत म्हणाले.

7. कोणत्या पक्षाला किती देणग्या दिल्या, ही माहिती आहे. 20 कोटीचा हिशेब माझ्याकडे आहे.. भाजपची माकडं उड्या मारत आहेत. आमच्या कुटुंबाची संपत्ती, एक वर्षात 1600 पटीने वाढलेली नाही. भाजप नेत्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1600 पटींनी वाढली, त्यांची संपत्ती चौकशी ईडीने केलीय का? ती आधी करा.

8. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, आम्ही लॉ मेकर आहोत, मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, तुमची संपत्तीचे आकडे माझ्याकडे, तुमच्या मुलांचे हिशोब माझ्याकडे, मात्र उद्धव ठाकरेंचा आदेश, बाळासाहेबांची शिकवण, कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, लढाई समोरासमोर करायची. “ईडीच्या नोटीचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो”, असं संजय राऊत म्हणाले.

9. गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा अशा नोटीसा पाठवल्या जातात.. याला फ्रस्टेशन, हतबलता म्हणतात.. राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी.. छत्रपतींची भूमी आहे, समोरासमोर लढा, असं आव्हान संजय राऊतांनी भाजपला दिलं.

10. गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात, असं राऊत म्हणाले.

संंबंधित बातम्या:

Sanjay Raut LIVE | आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल

(Sanjay Raut Press Conference 10 Points)

Follow Us
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची....
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.