AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार : संजय राऊत

भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार : संजय राऊत
संजय राऊत
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 29, 2020 | 10:40 AM
Share

मुंबई : ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Sanjay Raut on ED notice to wife Varsha Raut)

ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

“मला धमकी देणारा जन्माला यायचाय”

आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात, आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सरकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जात आहे, मात्र मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असं राऊतांनी निक्षून सांगितलं.

“विरोधकांचा मानसिक छळ हे राष्ट्रीय कर्तव्य”

सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांनाही काही काम हवं, त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचं काम करावं लागत आहे. ईडीची मला कीव येते, कारण अशा सरकारी संस्थांना एके काळी प्रतिष्ठा होती, तरीही सत्यमेव जयतेचा शिक्का असलेल्या सरकारी कागदपत्रांचा मी आदर करत राहीन, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (Sanjay Raut on ED notice to wife Varsha Raut)

“शिवसेनेतच राहणार, शिवसेनेतच मरणार”

राज्यसभा उमेदवारीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात मी सगळी माहिती दिली होती, ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी ठणकावलं.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी

(Sanjay Raut on ED notice to wife Varsha Raut)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...