AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरातील तरुणाचा खोडसाळपणा

मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. | bomb plant in Mantralaya

मोठी बातमी: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरातील तरुणाचा खोडसाळपणा
मंत्रालय
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: May 30, 2021 | 3:44 PM
Share

मुंबई: राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब (Bomb) ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.  (Search operation begins after phone call of bomb plant in Mantralaya in Mumbai)

मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

सध्या कोरोनामुळे मोजकेच कर्मचारी मंत्रालयात उपस्थित असतात. त्यामध्ये आज रविवारी असल्याने मंत्रालयात लोकांची अगदी कमी वर्दळ आहे. (Search operation begins after phone call of bomb plant in Mantralaya in Mumbai)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती