AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात जणांना कारने फरफटत 25 फूट खोल नाल्यात नेलं!

सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर (ठाणे) : रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीची वाट पाहणाऱ्यांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना शहापूरजवळ घडली. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडला. धडक देणारी कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होती. नेमकी काय घटना घडली? […]

सात जणांना कारने फरफटत 25 फूट खोल नाल्यात नेलं!
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, शहापूर (ठाणे) : रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीची वाट पाहणाऱ्यांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना शहापूरजवळ घडली. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडला. धडक देणारी कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होती.

नेमकी काय घटना घडली?

शहापूरजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने कामानिमित्त जाण्यासाठी नेहमीच लोक महामार्गावरुन गाड्या पकडतात. त्यामुळे या ठिकाणी कायमच लोकांची गर्दी असते. याचवेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या आठ लोकांना धडक दिली. इनोव्हा कारने दिलेली धडक इतरी जोरदार होती की, एका जणाला बाजूला फेकून सात जणांना फरफटत नेत 25 फूट खोल नाल्यात इनोव्ह पडली.

चौघांचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

या अत्यंत भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीररित्या जखमी झाली आहेत. यात इनोव्हा कारचा मालकही गंभीर जखमी झाल आहे. या अपघातात काही गंभीर असलेल्या काही जणांचे हात तुटले आहेत.

या अपघातात जे जखमी झाले आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यात हलवण्यात आले. चार जण गंभीर जखमी आहे, त्यातील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

चालक फरार

दरम्यान, अपघातग्रस्त इनोव्हा कारचा चालक एअर बॅगमुळे बचावला आहे. मात्र, अपघातानंतर चालक फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!