AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेने ‘मलबार हिल’ला नवं नाव सूचवलं!

मुंबई: शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याचे पडसाद आता मुंबईत दिसू लागले आहेत. कारण एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे.  मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही […]

शिवसेनेने 'मलबार हिल'ला नवं नाव सूचवलं!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई: शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याचे पडसाद आता मुंबईत दिसू लागले आहेत. कारण एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे.  मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे.

मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते.  त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

अशा प्रकारची नामकरण करण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्रिटिश काळातील नावे बदलण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यानंतर आता मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मलबार हिलचं नाव बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दादर स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी

दरम्यान, नुकतंच मुंबईतील दादर स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी भीम आर्मीने केली होती. दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी भीम आर्मीची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने हा इशारा दिला होता.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?