CM Uddhav Thackeray :तुमच्या मालकासह तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या तरी मुंबई वेगळी होऊ देणार नाही; उद्धव ठाकरेंनी भाजपला खडसावले

एक दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यावर बोललं पाहिजे. स्लीप ऑफ टंग म्हणून सोडणार नाही. 1 मे हा आपण साजरा करत होतो. त्यावेळची आठवण सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आठवण सांगितली, ते म्हणाले तेव्हा फडणवीस चुकून बोलले, ते त्यावेळी बोलून गेले की मुंबई स्वतंत्र करणार आहे.

CM Uddhav Thackeray :तुमच्या मालकासह तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या तरी मुंबई वेगळी होऊ देणार नाही; उद्धव ठाकरेंनी भाजपला खडसावले
तुमच्या मालकासह तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या तरी मुंबई वेगळी होऊ देणार नाही; उद्धव ठाकरेंनी भाजपला खडसावले
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 14, 2022 | 8:56 PM

मुंबईः शिवसेनेच्या (Shivsena) आजची सभा अनेक कारणामुळे चर्चेत आली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) काही दिवसांपूर्वीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल असं सांगितले होते. त्याच शिवसेनेच्या जोषात आणि आवेशात उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेला सुरुवात केली. सभेला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणत हिंदुत्वाचा आवेश भाजपकडून (Bharatiy Janata Party) आणला जात असल्याचे सांगत हे हिंदुत्वाचे रक्षक ते आहेत. मग समोर बसलेले कोण आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुंबई मराठी माणसाने रक्त साांडवून मिळवली आहे. आंदण म्हणून मिळाली नाही. मुंबईवेगळं करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही आणि ते करून टाकू आम्ही असेही त्यांनी सांगितले.

 

शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचं रक्त पेरलं

यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसैनिकांच्या धमन्यात शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचं रक्त पेरलं आहे. हा हिंदु् मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशाद आहे हिंदुत्वावार घाला घालण्याची असा सज्जड दम भरत त्यांनी आपली तोफ भाजपवर ढागली.

…तेव्हा फडणवीस चुकून बोलले

यावेळी त्यांनी सांगितले की, एक दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यावर बोललं पाहिजे. स्लीप ऑफ टंग म्हणून सोडणार नाही. 1 मे हा आपण साजरा करत होतो. त्यावेळची आठवण सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आठवण सांगितली, ते म्हणाले तेव्हा फडणवीस चुकून बोलले, ते त्यावेळी बोलून गेले की मुंबई स्वतंत्र करणार आहे.

आंदण म्हणून मिळाली नाही

हे देवेंद्र फडणवीस बोलले काकरण ती मालकाची इच्छा बोलून गेले. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या जरी आल्या ना तरी हे जमणार नाही कारण जिवंत पणा हा येथील मर्द मावळ्यात आहे. मुंबई मराठी माणसाने रक्त साांडवून मिळवली आहे. आंदण म्हणून मिळाली नाही. मुंबईवेगळं करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही आणि ते करून टाकू आम्ही असेही त्यांनी सांगितले

तोफ भाजपवर जोरदारपणे धाडली

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपली तोफ भाजपवर जोरदार पण धाडली. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय हे महाराष्ट्रात राहून कळलेलं नाही. त्यांच्यासाठी मध्येमध्ये बोलावं लागते असेही त्यांनी टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आम्ही ज्या ज्यांच्याबरोबर होतो ते खोटा हिंदुत्वाचा बुरखा घेतलेल्या पक्षासोबत होतो असे म्हणत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे यांचा दाखल देत मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे असंही त्यांनी सांगितले.