AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाट पाहण्याची चिंता मिटली, एसटीचं लोकेशन तुमच्या हातात

प्रवाशांना लोकेशन (ST Bus live location) समजावं यासाठी वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) चं लोकार्पण करण्यात आलंय.

वाट पाहण्याची चिंता मिटली, एसटीचं लोकेशन तुमच्या हातात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 20, 2019 | 9:18 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या वेळेबाबत (ST Bus live location) प्रवासी नेहमीच साशंक असतात. कारण, एसटी वेळेवर येण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे आणि त्यामुळे लवकर येऊन वाट पाहत बसावी लागते. पण आता प्रवाशांना लोकेशन (ST Bus live location) समजावं यासाठी वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) चं लोकार्पण करण्यात आलंय. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजू शकणार आहे. तसेच बसस्थानकावर एलसीडी टीव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार आहे. आपल्या जवळील थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या आणि सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ कळणार असल्याने प्रवाशांना प्रवासाचे पूर्वनियोजन करता येईल व त्यांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.

नाशिक विभाग आणि मुंबई – पुणे – मुंबई, बोरीवली – पुणे -बोरीवली, ठाणे – पुणे – ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हीटीएस – पीआयएस प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. पुढील 5 ते 6 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांना व्हीटीएस (vehicle tracking system) बसविण्यात येणार आहे.

सर्व महत्वाच्या थांब्यावर पीआयएस संच (passenger information system) बसविण्यात येणार आहेत. याबाबतचे काम सध्या वेगाने सुरु आहे. तसेच प्रवाशांना बसचं लोकेशन समजण्यासाठी मोबाईल app तयार करण्यात येत असून ते लवकरच उपलब्ध होणार असल्याचंही कळवण्यात आलंय.

महामंडळाच्या ताफ्यातील 18 हजार बसमधून दररोज 67 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या नव्या प्रणालीमुळे सर्व लहान मोठ्या एसटी बस थांब्याचे, गावांचे जीपीएस तंत्रज्ञानाव्दारे अक्षांश आणि रेखांशाव्दारे नकाशावर स्थान निश्चित करण्यात येत आहे. तसेच ज्या आंतरराज्य मार्गावर एसटी महामंडळाची सेवा आहे, अशा थांब्याचेही स्थान निश्चितीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई सेंट्रल येथे तयार करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामध्ये व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली असून तेथे एसटी बसेसचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन आणि निर्गमन तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक अहवाल प्राप्त होणार आहे.

Follow Us
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...