AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोधी निवड, केंद्रात होणार मंत्री?

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघातून पराभव झाला होता. आता सुनेत्रा पवार यांना केंद्रीय मंत्रीपद मिळतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोधी निवड, केंद्रात होणार मंत्री?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 18, 2024 | 10:46 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोधी निवड झाली आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर आल्यास ती आनंदाने स्वीकारू, असे त्यांनी याआधीच सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. पण सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी राज्यातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

बिनविरोध निवड

सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानले जात होते. पुण्यात त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होती की, जर केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाल्यास स्वीकारणार का? यावर त्या म्हणाल्या होत्या की, मला संधी मिळाली तर मी नक्कीच संधीचा फायदा घेईन.”

भाजपचे सहकारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) सध्या केंद्रातील NDA सरकारमध्ये कोणतेही मंत्रिपद मिळालेले नाही. नरेंद्र मोदी यांच्यासोबत 71 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांचा नव्या एनडीए सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून समावेश करण्याचा भाजपचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे आता सुनेत्रा पवार केंद्रात मंत्री होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीतले अनेक जण इच्छूक

लोकसभा निवडणुकीत तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना भावजय सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं होतं. पण बारामतीत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीये. तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे यांनी विजय मिलवला. पण पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. या पदासाठी राष्ट्रवादीतले अनेक जण इच्छूक असल्याचं देखील बोललं जात होतं. पण सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम लागला. विधिमंडळात महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे मविआकडून कोणीही अर्ज दाखल केला नव्हता.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली