AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | तौक्ते चक्रीवादळाचा कहर, मुंबईत झाड कोसळताना महिला धावली आणि…

विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोरुन सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाजूचे भले मोठे झाड कोसळले ( Taukte Cyclone Vikroli Tree fells)

VIDEO | तौक्ते चक्रीवादळाचा कहर, मुंबईत झाड कोसळताना महिला धावली आणि...
तौक्ते वादळाच्या तडाख्याने विक्रोळीत झाड पडले
| Updated on: May 18, 2021 | 10:29 AM
Share

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली आहे. यात घरं, दुकानं, गाड्या यांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी नागरिक जखमी देखील झाले आहेत. विक्रोळीत झाड पडून झालेल्या दुर्घटनेतून एक महिला सुदैवाने बचावली. हा घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.  (Taukte Cyclone Video Vikroli Park Site Tree fells Lady saved Miraculously CCTV Video)

विक्रोळी पार्क साईट परिसरात झाड कोसळले

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत कालच्या दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडं किंवा झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्या. यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, तर कोणाला गंभीर दुखापत झाली आहे. विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यामुळे एक महिला अगदी थोडक्यात वाचल्याचं समोर आलं.

रस्त्याने महिला जाताना वृक्ष उन्मळला

विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोरुन सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाजूचे भले मोठे झाड कोसळले होते. या वेळी या झाडाखालून काही पादचारी जाताना दिसत आहेत. यात एक महिला अगदी झाड कोसळत असताना त्याच्या खाली आली होती, परंतु मोठा आवाज झाल्याने ती धावत गेली आणि तिचे प्राण वाचले आहेत.

जीवितहानी टळल्याने दिलासा

हे झाड कोसळून पोलिसांच्या गाडीसह आजूबाजूचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ही सगळी घटना इथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Taukte Cyclone Vikroli Tree fells)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

तौक्ते चक्रीवादळचा तडाखा, वानखेडे स्टेडियमची अशी झाली अवस्था, फोटो व्हायरल

‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

(Taukte Cyclone Video Vikroli Park Site Tree fells Lady saved Miraculously CCTV Video)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.