दुसऱ्या दिवशीच हल्ला कसा? अचानक जमाव आला, आधी दगडफेक नंतर… महिलांचीही धरपकड, वांद्र्यात नेमकं काय घडलं?
मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळ गरीबनगरात बुलडोझर कारवाई करण्यात आली. काल मोठा राडा झाला. काही काळ तणावाची स्थिती होती. त्यामध्येच आजही प्रशासनाकडून कारवाईला सुरूवात करण्यात आलीये.

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळ गरीबनगरात बुलडोझर कारवाई करण्यात आली. काल मोठा राडा आहे. काही काळ तणावाची स्थिती होती. वांद्र्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काल पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर थेट लाठीचार्ज केला. अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई सुरु असताना दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते. यादरम्यानच आज तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच राहणार आहे. आज राहिलेल्या 40 टक्के इमारती पाडण्यात येणार आहेत. इतक्या मोठ्या विरोधानंतरही आज कारवाई सुरूच राहणार आहे. यादरम्यान शेकडो पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय. अनधिकृत झोपड्या हटवण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.
काल काही लोकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर आज पोलिस पूर्ण तयारीने आहेत. कारवाई सुरू असताना पोलिसांना टार्गेट करून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दगडफेक सुरूच होती. पोलिसांनी लाठीचार्ज करून काहींना ताब्यात घेतले. या दगडफेकीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालीत.
ही कारवाई सुरू असताना पहिल्या दिवशी व्यवस्थित कारवाई पार पडली. दुसऱ्या दिवशी अचानक मोठा जमाव आला. त्यांनी अगोदरच पोलिसांवर दगडफेक केली. या मोठ्या राड्यानंतरही आज कारवाई वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात होत आहे. सकाळपासूनच या कारवाईला सुरूवात झाली.
बांद्रा भाभा रूग्णालयाकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे एकूण 6 जखमी यांना भाभा रुग्णालयात आणला गेलं होतं
1 – विपुल विजयकुमार कदम M / 39 ( पोलिस ),घरी पाठविण्यात आला
2 – मनीष भीमराव बच्छाव M / 25 ( पोलिस ) घरी पाठविण्यात आला
3 – वैभव गीते M / 25 ( प्रदर्शनकारी , घरी पाठबिण्यात आला ).
4 – फिझान अनवाज खान M /22 ( प्रदर्शनकारी ,घरी पाठविण्यात आला )
5 – ए .राशिद खान M/ 17 ( प्रदर्शनकारी ,घरी पाठविण्यात आला )
6 – अन्सार अली बेग M /17 (प्रदर्शन कारी भर्ती असून प्रकृती स्थिर आहे )
त्याच बरोबर वि एन देसाई रुग्णालयात 4 पोलीस कर्मचारी यांना आणण्यात आला होता
1 – जितेंद्र कुमार सतेंद्र M /45 ( पोलीस , भर्ती ,प्रकृती स्थिर )
2 .नवनाथ अण्णा मुदगल M /45 ( पोलीस ,घरी पाठविण्यात आला ).
3 – ओंकार दीपक कोळी M / 39 ( पोलीस ,घरी पाठविन्यात आला ).
4 .चंद्रकांत धाम्बले M /45 ( पोलीस ,घरी पाठविण्यात आला )