AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांवर दगड फेकणं महागात पडणार… 8 पकडले, इतरांचा शोध सुरू; वांद्रे झोपडपट्टी पाडकाम प्रकरणी मोठी कारवाई

मोठी बातमी समोर येत आहे, वांद्रेमधील गरीब नगर झोपडपट्टीमधील अतिक्रम हटवताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांवर दगड फेकणं महागात पडणार... 8 पकडले, इतरांचा शोध सुरू; वांद्रे झोपडपट्टी पाडकाम प्रकरणी मोठी कारवाई
दगडफेक प्रकरणात आठ जण ताब्यात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 11:17 AM
Share

मुंबईमधील वांद्रे येथे असलेल्या गरीब नगरमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आली आहे. मात्र यावेळी स्थानिक लोक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकाला विरोध केला. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी आधी पोलिसांवर बाटल्या फेकल्या स्थानिकांकडून बाटल्या फेकण्यात आल्यानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आधी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र त्यानंतर स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानं पोलिसांकडून पुन्हा लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आठ जण ताब्यात 

दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना तिथे उपस्थित पोलिसांवर स्थानिकांनी दगडफेक केली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणात आता पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे, तर या दगडफेकीमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे.  या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

किरीट सोमय्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात दाखल 

दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे,  त्यांनी पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांच्या सोबत मोबाईल फोनवरून चर्चा केली. या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

वांद्रा मधील ज्या भागातील अतिक्रमण हटवण्यात येत आहे, ती जागा पश्चिम रेल्वेची आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पश्चिम रेल्वेकडून हे अतिक्रमण हटवण्यात येत आहे. अतिक्रम हटाव मोहिमेदरम्यान स्थानिकांनी पोलिसांवर आधी बाटल्या फेकल्या त्यानंतर दगडफेक देखील करण्यात आली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला. या प्रकरणात दगडफेक करणारे 8 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर इतर लोकांचा शोध सुरू आहे. या ठिकाणी जवळपास 1200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बांद्रा भाभा रुग्णळ्या कडून मिळालेल्या माहिती प्रमाणे एकूण 6 जण जखमी

1 – विपुल विजयकुमार कदम M / 39 ( पोलिस ),घरी पाठविण्यात आलं.

2 – मनीष भीमराव बच्छाव M / 25 ( पोलिस ) घरी पाठविण्यात आलं.

3 – वैभव गीते M / 25 ( प्रदर्शनकारी , घरी पाठबिण्यात आलं.)

4 – फिझान अनवाज खान M /22 ( प्रदर्शनकारी ,घरी पाठविण्यात आलं.)

5 – ए .राशिद खान M/ 17 ( प्रदर्शनकारी ,घरी पाठविण्यात आलं.)

6 – अन्सार अली बेग M /17 (प्रदर्शन कारी भर्ती असून प्रकृती स्थिर आहे )

वि एन देसाई रुग्णालयात 4 पोलीस कर्मचाऱ्यांना दाखल करण्यात आलं होतं

1 – जितेंद्र कुमार सतेंद्र M /45 ( पोलीस , भर्ती ,प्रकृती स्थिर )

2 .नवनाथ अण्णा मुदगल M /45 ( पोलीस ,घरी पाठविण्यात आलं .

3 – ओंकार दीपक कोळी M / 39 ( पोलीस ,घरी पाठविन्यात आलं)

4 .चंद्रकांत धाम्बले M /45 ( पोलीस ,घरी पाठविण्यात आलं )

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ