AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्यासाठी व्होट जिहाद महत्त्वाचा, तर आमच्यासाठी…, वांद्रे अतिक्रमण हटाव मोहिमेवर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया

वांद्रेमधील गरीब नगर झोपडपट्टीमधील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

त्यांच्यासाठी व्होट जिहाद महत्त्वाचा, तर आमच्यासाठी..., वांद्रे अतिक्रमण हटाव मोहिमेवर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
Kirit SomaiyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 7:08 PM
Share

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या गरीब नगरमधील झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेकडून अखेर बुलडोझर कारवाईला सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार येथील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. दरम्यान या कारवाईमुळे गरीब नगरमधील झोपडपट्टीमधील रहिवासी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.  स्थानिकांनी आधी पोलिसांच्या दिशेनं बाटल्या फेकल्या त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  सौम्य लाठीचार्ज केला, परंतु त्यानंतर स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केला. या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या?   

काही लँड माफिया, लँड जिहादवाल्यांनी तिथे अडथळे निर्माण केले आहेत. कोर्टाने आदेश दिले आहेत, तोडकाम झालेले आहे, अजून काही बाकी आहे.  काही लँड जिहादी माफिया, मुस्लिम माफिया, बांगलादेशी माफिया आता तिथे लोकांना भडकाऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आम्हाला मान्य नाही. असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  जो कोणी पोलिसांवर हल्ला करणार, जो कोणी रेल्वेच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करणार त्यांना राजकीय नेते, पक्ष शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, नवीन मुस्लिम लिग, काँग्रेस हे उसकवण्याचा प्रयत्न करणार, कारण त्यांच्यासाठी व्होट जिहाद महत्त्वाचा आहे, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. पोलिसानी संयम ठेऊन या सगळ्यांना इथून हाकलायचे आहे, आणि त्यांना जर कोणी उसकवणार असेल तर त्यातील एकालाही सोडू नका, अशी प्रतिक्रिया यावर सोमय्या यांनी दिली आहे.

दरम्यान पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओ यांनी दिलेल्या माहितीनुसार  या भागातील सुमारे 500 अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. अतिक्रम हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी घटनास्थळी  १२०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलीस यांचा समावेश आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ