तरुणीकडे जबरदस्तीने शारीरिक संबंधाची मागणी, तरुणावर गुन्हा

अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण : उधार घेतलेले पैसे व्याजासह दुप्पट करून परत कर, अन्यथा शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्यानंतर तरुणीने नकार दिला. यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणजवळ घडली आहे. या प्रकरणी घाबरलेल्या पीडित तरुणीने पोलिसात तक्रार केली असून तक्रारीनुसार पोलिसांनी विकृत इसम रवी पाटील विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास […]

तरुणीकडे जबरदस्तीने शारीरिक संबंधाची मागणी, तरुणावर गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण : उधार घेतलेले पैसे व्याजासह दुप्पट करून परत कर, अन्यथा शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्यानंतर तरुणीने नकार दिला. यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणजवळ घडली आहे. या प्रकरणी घाबरलेल्या पीडित तरुणीने पोलिसात तक्रार केली असून तक्रारीनुसार पोलिसांनी विकृत इसम रवी पाटील विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

पीडित मुलगी तीन बहिणी आणि आईसह राहते. आई घरकाम करते, तर वडील आजारी असतात. तिने काही महिन्यांपूर्वी घराचे भाडे देण्यासाठी परिसरात राहणाऱ्या रवी पाटील याच्याकडून  20 हजार रुपये व्याजाने घेतले. मंगळवारी पीडित मुलगी कामावरून आंबिवली येथील पाण्याची टाकी जवळून घराकडे परतत असताना त्या ठिकणी रवी पाटील मित्रांसह बोलत उभा होता.

रवी पाटीलने तरुणीला पाहताच तिला थांबवलं आणि व्याजाने घेतलेले पैसे दुप्पट करुन कधी देणार, अशी विचारणा केली. त्यावेळी पीडितेने सांगितलं, पैसे मी तुम्हाला दिले आहेत. आता कसले पैसे मागतो? पण रवी पाटीलने दुप्पट पैशांचा तगादा लावला.

दुप्पट पैसे देणार नसशील तर शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी रवी पाटीलने केली. घाबरलेल्या तरुणीने नकार देत तेथून पळ काढला आणि हा घडला प्रकार आपल्या ओळखीच्या काही जणांना सांगितला. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.